शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

रेशनची माहिती हवी, फक्त ॲपवर क्लीक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:16 IST

अकाेला : दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच निराधार, गोरगरीब लाभार्थींना सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत रेशनच्या अन्नधान्याचा लाभ दिला ...

अकाेला : दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच निराधार, गोरगरीब लाभार्थींना सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत रेशनच्या अन्नधान्याचा लाभ दिला जातो. जिल्ह्यात ४ लाख ६९ हजार ५७६ शिधापत्रिका असून, अंत्योदय, प्राधान्य कुटुंब व एपीएल शेतकरी लाभार्थींना गहू व तांदळाचा लाभ दिला जातो. त्यामध्ये आता जिल्हानिहाय धान्याची उचल आणि रास्तभाव दुकानदारांना धान्याचे वितरणही आता ‘ऑनलाइन’ पद्धतीने करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी लाभार्थी गेले असेल त्या ठिकाणी त्यांच्या जवळपासच्या दुकानाची माहिती व्हावी, त्या ठिकाणाहून त्यांना लाभ घेता यावा तसेच शिधापत्रिका संदर्भातील माहिती मिळावी यासाठी केंद्र सरकारने ‌वन नेशन वन रेशनकार्ड योजने अंतर्गत ‘मेरा रेशन’ ॲपचा शुभांरभ केला आहे. या माध्यमातून लाभार्थ्यांना एका क्लिकवर अद्यावत माहिती मिळणार आहे. मात्र यासाठी लाभार्थ्यांना मेरा रेशन ॲप डाऊनलोड करावा लागणार आहे.

गरीब तसेच गरजूंना रेशन मिळावे यासाठी शासनाने गरजूंना शिधापत्रिका दिली आहे. यासाठी लाभार्थ्यांची विभागणी करण्यात आली आहे. विभागणीनुसार लाभार्थ्यांना अन्नधान्य तसेच इतर सुविधा मिळतात. मात्र अनेक वेळा लाभार्थी एका गावातून दुसऱ्या किंवा अन्य राज्यातही जातो. अशावेळी त्याचे हाल होऊ नये, त्यांच्या हक्काचे धान्य, शिधापत्रिकेची अद्यावत माहिती मिळावी यासाठी ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ योजना सुरू केली. या माध्यमातून कुठलाही व्यक्ती कोणत्याही ठिकाणाहून लाभ घेऊ शकणार आहे. यासाठी आता ‘मेरा रेशन’ हा मोबाईल ॲपही विकसित करण्यात आला आहे.

या मिळणार सुविधा

लाभार्थ्यांना मिळणारे धान्य

जवळपास असलेले रास्त भाव दुकाने

शिधापत्रिकेवर उचल झालेल्या धान्याची माहिती

शिधापत्रिका पात्र आहे की अपात्र

आधार अद्ययावतबाबत माहिती

तक्रार व सूचना करण्याची सोय

‘मेरा रेशन’ ॲपवर लाभार्थ्यांना प्रत्येक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याअंतर्गत रास्त भाव दुकानातून त्याला त्रास होत असेल, धान्य मिळत नसेल किंवा अन्य माहितीसाठी लाभार्थी आपली तक्रार तसेच सूचनाही नोंदवू शकणार आहे. या तक्रारीचे समाधानही करण्यात येणार आहे.

शासनाच्या निर्देशाप्रमाणे पुरवठा साखळी व्यवस्थापनांतर्गत धान्याची उचल, रास्तभाव दुकानदारांकडून धान्याची मागणी आणि रास्तभाव दुकानदारांना धान्याचे वितरण करण्याची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे.

बी.यू. काळे

जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला

एकूण शिधापत्रिकाधारक- ४,३९,७६१

केशरी शिधापत्रिकाधारक- ३,०१,७१२

अंत्योदय शिधापत्रिकाधारक- १,१५,७१२