शेगाव (जि. बुलडाणा),दि. २८: काळया बाजारामध्ये जाणारा राशनाचा तांदुळ साठा बुलडाणा स् थानिय गुन्हे शाखेच्या वतीने शनिवारी पकडण्यात आला. यामध्ये १३३ क्वि.५किलो असून एमएच२८ -एच-९१२९ या क्रमांकाची गाडी जप्त करण्यात आली. शेगांव खामगांव रस्त्यालगतच्या गजानन अँग्रो इंडस्ट्रीजच्या टिनशेडच्या गोडावुनमध्ये राशनचा काळया बाजारामध्ये विक्रीकरीता साठवून ठेवण्यात आल्याची माहिती पथकाला मिळाली. आरोपी शे.असलम शे.ईस्माईल वय-२५ रा.इदगाह प्लॉट शेगाव, पंकज शर्मा, मनोज खंडेवाल शेगाव यांच्यावर कारवाई करण्यात आली असून कलम ३, ७ जीवनाश्यक वस्तु कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
शेगावात चार लाखाचा रेशनचा तांदुळ जप्त
By admin | Updated: August 28, 2016 23:14 IST