शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

‘रॅपिड टेस्ट’; रुग्णांच्या संख्येवरून मनपाच्या आरोग्य यंत्रणेचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 10:26 IST

शुक्रवारी चाचणी केलेल्या रुग्णांच्या संख्येवरून मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेचा गोंधळ उडाल्याचे समोर आले.

अकोला : शहरातील वयोवृद्ध नागरिक तसेच दुर्धर आजार असलेल्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून येत असल्यास त्यांच्यासाठी मनपा प्रशासनाने भरतीया रुग्णालयात ‘रॅपिड टेस्ट’ला प्रारंभ केला. शुक्रवारी चाचणी केलेल्या रुग्णांच्या संख्येवरून मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेचा गोंधळ उडाल्याचे समोर आले. सायंकाळी उशिरा या विभागाने सावरासावर करीत रुग्णसंख्या निश्चित केली. यावेळी एकूण ४६ संशयितांची तपासणी केली असता यामध्ये आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचे लोण मोठ्या प्रमाणात पसरल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. यादरम्यान, मागील काही दिवसांपासून शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घसरण होत असल्याचे मनपा प्रशासनाच्या निदर्शनास आले असून, ही बाब अकोलेकरांसाठी दिलासादायक मानली जात आहे. तरीसुद्धा या विषाणूला पूर्णपणे आळा घालण्याच्या उद्देशातून मनपा प्रशासनाने भरतीया रुग्णालयात वयोवृद्ध नागरिक तसेच दुर्धर आजारी असलेल्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्यांच्यासाठी ‘रॅपिड टेस्ट’ला प्रारंभ केला. या ठिकाणी मनपाची वैद्यकीय आरोग्य यंत्रणा तसेच निमा व जीपीए डॉक्टर संघटनांच्या माध्यमातून चाचणीची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.आकडेवारीवरून संभ्रम; सायंकाळी केली दुरुस्तीमनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेकडून सुरुवातीला ५६ संशयित रुग्णांची तपासणी केल्याचे कळविण्यात आले. त्यानंतर मात्र चूक लक्षात येताच सायंकाळी उशिरा तातडीने दुरुस्ती करण्यात आली. यावेळी ४६ रुग्णांपैकी आठ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या