शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वस्तापूर मानकरी येथील युवतीवर मेळघाटात बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 02:48 IST

अकोला : बाराव्या वर्गाची टीसी काढण्यासाठी टेंभ्रूसोंडा येथील आश्रमशाळेत गेलेल्या वस्तापूर मानकरी येथील १८ वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना २८ जुलै रोजी उघडकीस आली.

ठळक मुद्देअकोट ग्रामीण पोलिसांनी नाकारली तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बाराव्या वर्गाची टीसी काढण्यासाठी टेंभ्रूसोंडा येथील आश्रमशाळेत गेलेल्या वस्तापूर मानकरी येथील १८ वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना २८ जुलै रोजी उघडकीस आली. या प्रकरणी पीडित युवती व तिचे वडील अकोट ग्रामीण पोलिसात तक्रार देण्यासाठी आले असता, घटनास्थळ चिखलदरा पोलीस स्टेशन हद्दीत असल्याने तिथे पाठवण्यात आले. चिखलदरा पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली.अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या वस्तापूर मानकरी येथील १८ वर्षीय युवती टेंभ्रूसोंडा येथील आश्रमशाळेत टीसी काढण्यासाठी गेली होती. तेथून परत येत असताना पंकज ईश्वर गौतम, सोनू बलराम सालवे व दादू सुखा यांनी तिला गावाला सोडून देतो असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून ती त्यांच्यासोबत गेली. तिला घरी सोडून न देता आरोपींनी धारणीच्या जंगलात नेले. तेथे जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. यानंतर त्यांनी तिला रानपिसा येथे त्यांच्या नातेवाईकांकडे नेले. तेथेही तिच्यावर १८ ते २३ तारखेपर्यंत अत्याचार केले. इतकेच नव्हे, तर आरोपींच्या गावी माजरोड येथेही २६ जुलैपर्यंत अत्याचार केले. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीला सोडून दिले. घरी पोहोचताच पीडितेने पालकांना आपबिती सांगितली. तिच्या पालकांनी २८ जुलै रोजी पीडितेबरोबर अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले. मात्र, अकोट पोलिसांनी घटनास्थळ चिखलदरा पोलिसांच्या हद्दीत असल्याने त्यांना तेथेच फिर्याद देण्याचा सल्ला दिला. शेवटी पीडितेच्या पालकांनी चिखलदरा ठाणे गाठून याबाबत तक्रार केली. या फिर्यादीवरून चिखलदरा पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३६३, ३७६, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.२८ जुलै रोजी पीडित युवती तिच्या वडिलांबरोबर ग्रामीण पोलिस स्टेशनला आली होती. घटनास्थळ चिखलदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने त्यांनी आम्हाला तेथेच तक्रार दाखल करायची असल्याचे सांगितले.- पी.जे. अब्दागिरे, ठाणेदार, अकोट ग्रामीण पोलीस ठाणे