शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

साळीवर बलात्कार; जावयास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:58 IST

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत  रहिवासी असलेल्या १५ वर्षीय साळीला जीवे मारण्याची  धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करणार्‍या २४ वर्षीय  जावयास जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जी. भालचंद्र  यांच्या न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.  पॉस्को कायद्यामध्ये अकोला येथील न्यायालयात  पहिल्यांदाच आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात  आली आहे.

ठळक मुद्देपॉस्को कायद्यामध्ये पहिल्यांदाच कारावासपीडितेच्या मुलासोबत आरोपीचा डीएनए जुळला!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत  रहिवासी असलेल्या १५ वर्षीय साळीला जीवे मारण्याची  धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करणार्‍या २४ वर्षीय  जावयास जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जी. भालचंद्र  यांच्या न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.  पॉस्को कायद्यामध्ये अकोला येथील न्यायालयात  पहिल्यांदाच आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात  आली आहे.शिवणी येथील रहिवासी  एका २४ वर्षाच्या इसमाच्या  पत्नीची २0१६ मध्ये प्रसूती असल्याने घरचे कामकाज  करण्यासाठी त्याची सासू व १५ वर्षीय साळी आली हो ती. पत्नी व सासू घरी नसताना सदर इसम हा व १५ वर्षीय  साळी दोघेच घरात होते. यावेळी त्याने या अल्पवयीन  मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार  केला. त्यानंतर दोन ते तीन वेळा त्याने अत्याचार केल्यानंतर या  मुलीला गर्भधारणा झाली. त्यामुळे तिची प्रकृती  खालावल्याने तिच्या आई-वडिलांनी तिला १५ एप्रिल  २0१६ रोजी रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी ती पाच  महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. हा प्रकार ऐक ताच आई-वडिलांना धक्काच बसला, त्यांनी मुलीला  विचारणा केली असता, तिने घडलेला अत्याचार कथन  केला. त्यामुळे लगेच या प्रकरणाची तक्रार एमआयडीसी  पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी भारतीय दंड  विधानाच्या कलम ३७६ (२), ५0६ आणि पॉस्को  कायद्याच्या कलम ३ व ४ नुसार गुन्हा दाखल केला. या  प्रकरणाचा तपास पीएसआय हर्षल चापले यांनी करून,  दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. जिल्हा व सत्र  न्यायाधीश जी. जी. भालचंद्र यांच्या न्यायालयाने नऊ  साक्षीदार तपासल्यानंतर आरोपीला पॉस्को कायद्यामध्ये  जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच १0 हजार रुपये दंड ठोठावला असून, दंड न  भरल्यास आणखी तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा  सुनावली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अँड. आनंद गोदे  यांनी कामकाज पाहिले.या प्ररकरणाचा निकाल देतांना  न्यायाधिशांनी  पीडितेचे नाव समोर येऊ नये याची दक्षता  घेण्याच्या सूचना माध्यमांना केल्या आहेत त्याची जाण  ठेवत ‘लोकमत’ ने आरोपीचे नावही सदर वृत्तात घेणो  टाळले आहे कारण आरोपीच्या नावामुळे पीडितेची  ओळख सहज पटणे शक्य होते 

पीडितेच्या मुलासोबत आरोपीचा डीएनए जुळला!१५ वर्षीय पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिला  काही महिन्यांपूर्वी बाळ झाले. या बाळाचे व आरोपीचे  डीएनए तपासण्यात आले. यामध्ये सदर बाळ हे आरो पीचेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. बाळ आणि आरो पीचे डीएनए तपासणी केल्यानंतर हा पुरावा  न्यायालयामध्ये सादर करण्यात आल्याची माहिती आहे.