शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर लिपिकास तीन वर्षांचा सश्रम कारावास

By admin | Updated: January 23, 2016 01:45 IST

अकोल्यात प्रतिनियुक्तीवर आणण्यासाठी ३२ हजार रुपयांची घेतली होती लाच.

अकोला- वेल्लुर येथील मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत असलेल्या एका स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरला खामगाव येथे बदली देऊन, तेथून अकोल्यात प्रतिनियुक्तीवर आणण्यासाठी ३२ हजार रुपयांची लाच घेणार्‍या आरोग्य उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी तीन वर्षांंच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच ५0 हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास आणखी एक वर्षांंंची शिक्षा न्यायालयाने आरोपीस सुनावली.जठारपेठ येथील रहिवासी डॉ. अर्चना टापरे (जावरकर) या वेल्लुर येथील मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत होत्या. त्यांना आरोग्य संचालक मुंबई यांच्याद्वारे अकोला परिमंडळात बदलीचे पत्र देण्यात आले होते. त्यानंतर अचर्ना टापरे यांचे वडील चंद्रकांत टापरे व डॉ. संदीप अरसड यांनी २६ मार्च २00२ रोजी सदरचे पत्र घेऊन तत्कालीन आरोग्य उपसंचालक डॉ. सुभाष वानखडे यांची भेट घेतली. वानखडे यांनी डॉ. अरसड व जावरकर यांना अकोल्यात जागा रिक्त नसल्याचे सांगून, खामगाव व शेगाव येथे रिक्त जागा असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोग्य उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक कृष्णा तुकाराम पराते (५0) याने १९ एप्रिल २00२ रोजी डॉ. अरसड यांच्याशी संपर्क साधून, त्यांना खामगाव येथे बदली देऊन त्यानंतर अकोल्यात प्रतिनियुक्ती देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यासाठी आरोग्य उपसंचालक वानखडे यांचे ३५ हजार रुपये व माझे २ हजार, असे एकूण ३७ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर ३२ हजार नगदी व ५ हजार रुपये नंतर देण्याचे ठरले. मात्र, डॉ. अरसड यांना पैसे देण्याचे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. २२ एप्रिल २00२ रोजी लिपिक कृष्णा पराते याच्याकडे ३२ हजारांची रक्कम जमा केली. यावेळी सापळा रचून असलेल्या अकोला एसीबीने पराते याच्याकडून ३२ हजार रुपये जप्त केले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून एसीबीचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक वाय. डी. पाटील यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सदर प्रकरणाची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. देशपांडे यांच्या न्यायालयात झाली असून, त्यांच्या न्यायालयाने ८ साक्षीदार तपासले. सोबतच आढळलेल्या पुराव्यावरून पराते याला दोषी ठरवीत ३ वर्षांंच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सोबतच ५0 हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी एका वर्षांच्या कैदेची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अँड. मंगला पांडे यांनी कामकाज पाहिले.