शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2017 01:27 IST

पहिली पत्नी असताना युवतीशी संबंध; युवतीलाही झाली दोन मुले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जळगाव खान्देश जिल्ह्यातील म्हैसांगवी येथील रहिवासी एका इसमाने पहिली पत्नी असताना शहाबाद येथील एका युवतीला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर रेल्वे क्वॉर्टरमध्ये बलात्कार केल्याची घटना २०११ मध्ये घडली. त्यानंतर वारंवार शारीरीक संबंध ठेवल्याने या युवतीला एक मुलगा व मुलगी झाली असून, युवतीच्या तक्रारीवरून रामदासपेठ पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातील अशोक तायडे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.म्हैसांगवी येथील रहिवासी अशोक मुरलीधर तायडे हा अकोल्यातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या रेल्वे क्वॉर्टरमध्ये मित्राकडे राहावयास आला होता. या ठिकाणी शहाबाद येथील २२ वर्षीय युवती तिच्या मावस बहिणीकडे रहिवासी होती. अशोक तायडे याने २०११ मध्ये या युवतीशी बलात्कार केला. त्यानंतर युवतीने आरडाओरड केली असता, तिला लग्नाचे आमिष दाखवून त्याच्या गावी म्हैसांगवी येथे युवतीला घेऊन गेला. या ठिकाणी सदर युवतीचे शारीरिक शोषण केले. यामध्ये युवती गर्भवती झाल्यानंतर तिला एक मुलगा आणि त्यानंतर पुन्हा एक मुलगी झाली. युवतीने त्याला लग्नाची मागणी केली असता, त्याने लग्न करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे सदर युवतीने अकोला गाठून या इसमाविरुद्ध बलात्कार, फसवणूक व अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये दिली. पोलिसांनी अशोक तायडे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४१७, ४७१, ३७६ आणि ३७७ सह पॉस्को अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.पॅन कार्ड, आधार कार्ड बनावट बनविले!अशोक तायडे याने सदर युवतीचे नाव वापरून पॅन कार्ड व आधार कार्डही बनविले असल्याचे तक्रारीत नमूद आहे. यामध्ये अशोक तायडे याने आधार कार्ड व पॅन कार्डवर नाव युवतीचे ठेवले तर छायाचित्र त्याच्या पहिल्या पत्नीचे लावले आहे. अशी तक्रारही या युवतीने ठाण्यात दिली असून, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू के ली आहे.