शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंदेकृविला मानांकनात ४८ वा क्रमांक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 03:02 IST

अकोला : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा सर्वच अनुषंगाने दर्जा घसरला असून, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) मानांकनात ४८ वा क्रमांकावर राहील्याने विद्यापीठ व संबधीत यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत.

ठळक मुद्देदर्जा घसरला विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे व संबंधित यंत्रणेचे धाबे दणाणले!आज निघणार जाहिरात

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा सर्वच अनुषंगाने दर्जा घसरला असून, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) मानांकनात ४८ वा क्रमांकावर राहील्याने विद्यापीठ व संबधीत यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत.भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अधिस्विकृती समितीने राज्यातील कृषी विद्यापीठाचा आढावा यावर्षीच्या सुरू वातीलाच घेतला होता.आढाव्यात कृषी विद्यापीठांचे शिक्षण,संशोधन व विस्तार काम समाधानकारक दिसले नाही. म्हणूनच आयसीआरने या कृषी विद्यापीठांची अधिस्विकृती रद्द केली होती. त्याचे चांगलेच पडसाद उमटले होते. ही अधिस्विकृती हटवून कृषी विद्यापीठांना संशोधनासाठीचा निधी मिळावा,यासाठीचे प्रयत्न शासनाकरवी करण्यात आले. २0१४ पर्यंत राज्यात खासगी कृषी महाविद्यालयांची संख्या भरमसाठी वाढली पण कृषी विद्यापीठांची संचालक,विभागप्रमुख, प्राध्यापक आदी अध्र्यांच्यावर पदे रिक्त होती. शासनाने रिक्त पदेच न भरल्याने शिक्षण, संशोधन व कृषी विस्तार कार्यांचा ताण हा अपूर्‍या मणुष्यबळावर पडला. कृषी विद्यापीठाचे शासकीय महाविद्यालय तसेच खासगी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा, उत्तर पत्रिका तपासणी आदी अतिरिक्त कामे करावी लागत असल्याने शैक्षणिक गुणवत्ता ढासळली, संशोधनावरही परिणाम झाले. आयसीएआरच्या अधिस्विकृती समितीला हे सर्व ठळकपणे दिसले. त्याचाच परिणाम समोर आला असून, राज्यातील कृषी विद्यापीठांचा दर्जा घसरला आहे. परिणामी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी प्रचंड मागे पडले असून, ‘टॉप टेन’ मध्ये राहणारे हे विद्यापीठ मानाकंनात ४८ व्या क्रमाकांवर पोहोचले आहे.दरम्यान, गत दोन वर्षांत राज्यातील कृषी विद्यापीठांची जवळपास सर्वच रिक्त पदे भरण्यात आली आहे. खासगी ‘क’ व ‘ड’ श्रेणीतील महाविद्यालयावरही कारवाईचा बडगा महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने (एमसीएईआर)   उगारल्याने यात सुधारणा होत असल्याचा दावा एमसीएईआरव्दारे केला जात आहे. संचालक, विभाग प्रमुख,प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ व कनिष्ठ संशोधन सहायकांची पदे भरण्यात आली आहेत. त्यामुळे याचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याचे कृषी विद्यापीठाचे म्हणने आहे.

आज निघणार जाहिरातदरम्यान कृषी विद्यापीठाची सहयोगी अधिष्ठाता पदे भरण्यासाठी बुधवारी जाहिरात निघणार असल्याचे वृत्त आहे.

आयसीएआरच्या अधिस्विकृती समितीने सात ते आठ वर्षांनंतर आढावा घेतला होता. आता कृषी विद्यापीठांची जवळपास पदे भरण्यात आली असून, खासगी महाविद्यालयाच्या दर्जातही सुधारणा होत आहे. आता जर अधिस्विकृती समिती आली तर आपला दर्जा व क्रमांक सुधारलेला दिसणार आहे.- डॉ.राम खर्चे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद,पुणे.