अकोला , दि. २९: राणी सती धाम येथे राणी सती दादी यांचा पावन वार्षिक महोत्सवास गुरुवारी मोठय़ा थाटात प्रारंभ झाला. कृष्ण जन्म पर्वावर नृत्य विशारद अर्चना भट्ट यांच्या बालिकांनी बहारदार कृष्ण नृत्ये सादर करून या रंगारंग सोहळ्यात एकच रंगत आणली. उमेश ऊर्फ डब्बू शर्मा, नेतल शर्मा यांनी कृष्ण भजने सादर करून परिसर भक्तिमय केला. मध्य रात्रीपयर्ंत हा भक्तिमय सोहळा सुरू होता. भादवा बदी अमावास्यावर आयोजित दादी यांच्या पावन उत्सवाचा समारोप ३१ऑगस्ट रोजीच्या छप्पन भोग दर्शनाने होणार आहे. राणी सती धाम परिसरात २६ ते २८ ऑगस्टपयर्ंत दु. ३ ते साय.६ पयर्ंंत मुंबई येथील प्रख्यात भजनकार प्रमोद शर्मा दादी यांचा मंगल पाठ होणार आहे. शनिवार, २७ ऑगस्ट रोजी रात्री ७.३0 वा.ललित अग्रवाल यांच्या संचाच्यावतीने अर्थसहित सुंदरकांड सादर करण्यात येणार आहे. सोमवार, २९ ऑगस्ट रोजी ४ वा. राधाकृपा मंडळाच्यावतीने भजन कार्यक्रम होणार असून, ३0 ऑगस्ट रोजी रात्री ८ वा. कलकत्ता येथील भजनकार अभिजीतकुमार अग्रवाल यांच्या भव्य भजन संध्येचा कार्यक्रम होणार आहे. दादी यांच्या या वार्षिक सोहळ्याचे समापन १ सप्टेंबर रोजी अमावस पूजन व महिलांच्या सामूहिक मंगलपाठाने होणार आहे. या वार्षिक सोहळ्याचे यजमान जगदीशचंद्र मित्तल, दिलीप खत्री, कविता अग्रवाल, कैलाशचंद्र अग्रवाल मामाजी, द्वारकादास अग्रवाल बोरगाववाले, त्रिलोकचंद अग्रवाल, गोपाल पसारी, तारादेवी अग्रवाल, नरेंद्र अग्रवाल आहेत. या वार्षिक उत्सवाचा भाविक भक्तांनी मोठय़ा संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन राणी सती धामचे अध्यक्ष जगदीशचंद्र बाछुका, गणपतराय खेतान, बजरंग चुडीवाल, सीताराम झुनझुनवाला, श्रीराम गोयंका, नवीन झुनझुनवाला, गोपालदास अग्रवाल आदींनी केले आहे.
राणी सती वार्षिक महोत्सवाचा रंगारंग प्रारंभ
By admin | Updated: August 30, 2016 02:03 IST