मळसूर (जि. अकोला): रानडुकरांनी रात्रभर हैदोस घातल्याने येथील एका शेतकर्याची केळीची बाग उद्ध्वस्त झाली आहे. यामुळे सदर शेतकर्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. येथील विनोद शालीग्राम राऊत यांच्या एक हेक्टर क्षेत्रावरील केळीच्या बागेत रानडुकरांनी शनिवारी रात्री हैदोस घातला. रात्रभर हैदोस घातल्याने केळीची जवळपास ३00 झाडे जमीनदोस्त झाली. यामुळे त्यांचे अंदाजे ६0 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सरपंच, तलाठी यांनी नुकसानाची पाहणी केली. आलेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या मळसूर शिवारात रानडुकरांच्या टोळय़ा आहेत. यापूर्वीही राऊत यांच्या शेतातील पिकांचे रानडुकरांनी नुकसान केले आहे. वन विभागाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी विनोद राऊत यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
रानडुकरांच्या हैदोसाने केळीची बाग उद्ध्वस्त
By admin | Updated: April 4, 2016 02:19 IST