शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकराच्या हल्ल्यात युवक जागीच ठार

By admin | Updated: April 6, 2016 01:54 IST

रिसोड तालुक्यातील घटना ; मृत बुलडाणा जिल्ह्यातील

रिसोड: शेतशिवारात असलेल्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका २८ वर्षीय युवकावर रानडुकराने हल्ला चढविला. पोट, मांडी व शरिराच्या अन्य भागावर हल्ला केल्याने सदर युवकाने जाग्यावरच प्राण सोडले. ही धक्कादायक घटना तालुक्यातील तालुक्यातील करडा येथे ५ एप्रिल रोजी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास घडली. सुनील पन्नासे भोसले असे मृतक युवकाचे नाव असून, तो बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. बुलडाणा जिल्हय़ातील अरवड येथील सुनील भोसले यांची सासरवाडी रिसोड तालुक्यातील बिबखेडा आहे. तीन दिवसांपासून सुनील हा बिबखेडा येथे आलेला होता. मंगळवारी तो तालुक्यातील करडा येथील महादेवबाबा मंदिरात दर्शनासाठी जात असताना, रानडुकराने त्याच्यावर अचानक हल्ला चढविला. पोट, मांडी व शरिराच्या अन्य भागावर चावे घेतल्याने तसेच हल्ला चढविल्याने सुनील हा जागेवरच बेशुद्ध पडला. शेतशिवारातून जाणार्‍या काही नागरिकांना हा प्रकार निदर्शनात येताच, सुनीलला ग्रामीण रुग्णालय रिसोड येथे तातडीने आणण्यात आले; मात्र तोपर्यंत बराच वेळ झाला होता. डॉक्टरांनी सुनील भोसले यास मृत घोषित केले. सुनीलच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असून, पत्नी, दोन मुली व मुलगा पोरका झाला आहे. अलिकडच्या काळात रानडुकराच्या हल्ल्यात युवक ठार होण्याची ही पहिली घटना घडल्याने करडा शेतशिवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुनीलच्या अपघाती मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. या भागात वन्य प्राण्यांचा हैदोस वाढला असून, पिकांचे नुकसान मोठय़ा प्रमाणात करण्यात येत आहे. वनविभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.