शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘रामू... समाजाला मी एकटाच डॉक्टर आहे!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 14:18 IST

अकोला : भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्यावतीने रविवारी अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त लहान उमरीतील भीमशक्ती युवक संघटनेच्यावतीने साकारण्यात आलेला ‘रामू... तुला जो आजार आहे, त्याचे हजारो डॉक्टर आहेत; पण, माझ्या समाजाला जो आजार आहे, त्याचा मी एकटाच डॉक्टर आहे! ’ ...

ठळक मुद्देबाबासाहेब -रमाई यांच्यातील संवादाचा देखावा ठरला चित्तवेधक

अकोला : भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्यावतीने रविवारी अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त लहान उमरीतील भीमशक्ती युवक संघटनेच्यावतीने साकारण्यात आलेला ‘रामू... तुला जो आजार आहे, त्याचे हजारो डॉक्टर आहेत; पण, माझ्या समाजाला जो आजार आहे, त्याचा मी एकटाच डॉक्टर आहे! ’ हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई आंबेडकर यांच्यातील संवादाचा देखावा आंबेडकरी अनुयायांसाठी चित्तवेधक ठरला.. दसºयाच्या दुसºया दिवशी अकोल्यात होणाºया या धम्मचक्र प्रवर्तन दिन समारंभाला अकोला जिल्ह्यासह वाशिम, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यातील आंबेडकरी बौद्ध उपासक-उपासिकांसह आंबेडकरी अनुयायांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या पृष्ठभूमीवर कार्यक्रमाच्या ठिकाणी अकोल्यातील लहान उमरी येथील भीमशक्ती युवक संघटनेच्यावतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई आंबेडकर यांच्यातील संवादाचा देखावा साकारण्यात आला आहे. एका झोपडीसमोरील खाटेवर रमाई विश्रांती करीत असून, त्यांच्या शेजारी डॉ. बाबासाहेब बसले आहेत. स्वत:कडे आणि कुटुंबाकडे लक्ष देण्याची कळवळून विनवणी रमाई डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना करीत आहेत. तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रमाई यांना सांगतात ‘रामू... तुला जो आजार आहे, त्याचे हजारो डॉक्टर आहेत. पण, माझ्या समाजाला जो आजार आहे, त्याचा मी एकटाच डॉक्टर आहे.’ बाबासाहेब आणि रमाई यांच्यातील ह्दयस्पर्शी संवादाचा मूर्तिकार अरुण मेसरे यांनी साकारलेला हा देखावा आंबेडकरी अनुययांचे चित्त वेधून घेणारा ठरला आहे.

‘भीमवाडी’तील झोपडीसमोरसाकारला संवाद!भीमशक्ती युवक संघटनेच्यावतीने साकारण्यात आलेल्या ‘भीमवाडी’मध्ये बांबू, तट्टा व कवेलू आणि शेण-मातीने सारवलेल्या झोपडीसमोर डॉ. बाबासाहेब आणि रमाई यांच्यातील हा संवाद मूर्तिकाराने साकारला आहे.