अकोला : मनपा क्षेत्रातील दारिद्रय़रेषेखालील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील लोकांच्या घराचे स्वप्न आचारसंहितेमुळे लांबणीवर गेले. रमाई आवास (घरकुल) योजनेंतर्ग त घरकुल बांधण्यासाठी मनपाला प्राप्त ३६ कोटी ३0 लाखांचे अनुदान ठोस नियोजनाअभावी पडून आहे. शिवाय, २२६ कामांच्या फाइलवर आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी स्वाक्षरी न केल्यामुळे संबंधित कामे रखडल्याचे चित्र तूर्त दिसत आहे. महापालिका हद्दीतील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई आवास (घरकुल) योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांचे बांधकाम मागील चार वर्षांपासून रखडले आहे. सन २00९-१0 मध्ये या योजनेंतर्गत १३३ घरकुलांच्या बांधकामाला परवानगी मिळाली. परंतु, घरकुलाची रक्कम वाढल्यामुळे व निधीअभावी या घरकुलांचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. यानंतर मनपाला समाजकल्याण विभागाकडून २२६ पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले. या व्यतिरिक्त सर्वेक्षण झालेल्या ६00 पेक्षा जास्त घरकुलांचे प्रस्ताव अडगळीत पडून आहेत. शासनाकडून अकोला मनपाला १ हजार ५७५ घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले असून, याकरिता पहिल्या टप्प्यात ३१ कोटी ५0 लाख अनुदान प्राप्त झाले. त्यानंतर पुन्हा ४ कोटी ८0 लाख मिळाले. अशा एकूण ३६ कोटी ३0 लाखांपैकी मनपाने २६ कोटी बँकेत डिपॉझिट केले. परंतु, अद्यापही पहिल्या टप्प्यातील १३३ व दुसर्या टप्प्यातील २२६ कामे नियोजनाअभावी रखडल्याची स्थिती आहे. कोट्यवधीचा निधी मनपात पडून असतानादे खील गोरगरिबांना त्यांच्या हक्काच्या घरापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. आचारसंहिता संपल्यामुळे प्रशासनासह सत्तापक्षाने यावर तात्काळ निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.
२६ कोटींची ठेव; व्याज नाही!
घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्राप्त अनुदानातून मनपाने २६ कोटी रुपये बँकेत ह्यडि पॉझिटह्ण ठेवले आहेत. एवढी मोठी रकम बँकेत ठेव असली तरी त्यापासून मिळणार्या व्याजाचा लाभ मात्र प्रशासनाला घेता येणार नसल्याची माहिती आहे. संबंधित व्याजाची र क्कम नियमानुसार शासनाकडे परत करावी लागणार आहे.