शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

 राजनापूर खिनखिनी होणार 'सुजलाम् सुफलाम्'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 18:02 IST

Rajnapur to be 'Sujalam Sufalam' : नाला खोलीकरण झाल्याने व नाल्यावर सिमेंट बंधारे असल्याने हे पावसाचे पाणी त्या बंधाऱ्यामध्ये साठविल्या गेल्याने भविष्यात शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी मोठा फायदा होणार आहे. 

 - संजय उमक मूर्तिजापूर :तालुक्यातील राजनापूर खिनखिनी या गावात भारतीय जैन संघटना व ग्रामपंचायत राजनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने  राजनापुर येथील दोन नाले खोलीकरण करण्यात आले, राजनापूर परिसरात गेल्या आठ दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळला. नाला खोलीकरण झाल्याने व नाल्यावर सिमेंट बंधारे असल्याने हे पावसाचे पाणी त्या बंधाऱ्यामध्ये साठविल्या गेल्याने भविष्यात शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी मोठा फायदा होणार आहे.                 पालकमंत्री बच्चु कडु यांनी दत्तक घेतले गाव म्हणून राजनापूर खिनखिनीची ओळख आहे. या गावात अनेक विकास कामांना वेग आला असून अलीकडेच गावती दोन मोठ्या नाल्याचे खोलीकरणाचे काम करण्यात आले आहे. नाला २० ते  २२ फूट खोल असून सध्या नाल्यात १० ते १५  फूट पाणी साचले आहे. गत आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने राजनापूर परिसरातल्या विहिरींची पातळी एक ते दोन फुटांनी वाढली असून खरीप आणि रब्बी पिकाची चिंता या नाला खोलीकरणाने मिटली आहे. भारतीय जैन संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिल्याने, शेतकरी सुखावला आहे. भारतीय जैन संघटनेच्या 'सुजलाम् सुफलाम्' अकोला या अभियानांतर्गत राजनापूर खिनखिनी परीसरातील शेत शिवार 'सुजलाम् सुफलाम्' होणार आहे. यामुळे गावातील पाणी विहरी व विंधण विहीरीची पाणी पातळी वाढण्यास मदत झाली असून भविष्यात होणाऱ्या पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी गाव सज्ज झाले आहे. राजनापूर परिसरा या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागले असून पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न तडीस निघाला आहे.   यासाठी भारतीय जैन संघटनेचे जिल्हा समन्वयक प्रा. सुभाष गादिया व जिल्हा व्यवस्थापन नितींजी राजवैद्य व पालक मंत्री बच्चू कडू यांनी आम्हाला मोलाचे सहकार्य त्यांच्या या सहकार्याने शेतकऱ्यांना चांगलाच फायदा झाला आहे. -प्रगती रुपेश कडू, सरपंच राजनापूर खिनखिनी

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोला