शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राजेश भारती यांनी जाहीर केली उमेदवारी  !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:32 IST

अकोला : पक्षाच्या धोरणानुसार काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आणि महानगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया ऑगस्ट महिन्यात होणे क्रमप्राप्त होते.मात्र ही प्रक्रिया लांबली. आ.राजेशकुमार यांनी सायंकाळ पर्यत विविध नेत्यांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली यावेळी राजेश भारती यांना अध्यक्षपदासाठी आठ नगरसेवकांसह सर्वाधीक पदाधिकार्‍यांनी पसंती दिली. यावेळी भारती यांनी मी निवडणूक लढविण्यास तयार आहे असे स्पष्ट करीत स्व:ताची उमेदवारी जाहिर केली.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आणि महानगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया राजेश भारती यांना अध्यक्षपदासाठी आठ नगरसेवकांसह सर्वाधीक पदाधिकार्‍यांनी पसंती

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पक्षाच्या धोरणानुसार काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आणि महानगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया ऑगस्ट महिन्यात होणे क्रमप्राप्त होते.मात्र ही प्रक्रिया लांबली. आ.राजेशकुमार यांनी सायंकाळ पर्यत विविध नेत्यांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली यावेळी राजेश भारती यांना अध्यक्षपदासाठी आठ नगरसेवकांसह सर्वाधीक पदाधिकार्‍यांनी पसंती दिली. यावेळी भारती यांनी मी निवडणूक लढविण्यास तयार आहे असे स्पष्ट करीत स्व:ताची उमेदवारी जाहिर केली.या बैठकीमध्ये काँग्रेसचे प्रदेश महासचिव मदन भरगड यांनीसुद्धा कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्याचा आग्रह जिल्हा निवडणुक अधिकारी आ. राजेशकुमार यांच्याकडे धरला. भरगड यांनी सांगितले की, पक्षामध्ये पदांवर ठाण मांडून बसणार्‍या काही निष्क्रिय पदाधिकार्‍यांमुळे संघटना कमकुवत झाली आहे. वैयक्तिक स्वार्थापोटी काही पदाधिकार्‍यांनी पक्षाची नितीमत्ता गहाण ठेवल्यामुळे पक्षाचे अतोनात नुकसान झाल्याचा आरोप  केला. ‘ज्यांच्या मनात चोर असेल तो निवडणुकीला सामोरे जाण्यास घाबरणार’ असे नमूद करीत भरगड यांनी निवडणूक घेण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला राजेश भारती यांनी अनुमोदन दिले. 

काय म्हणाले पदाधिकारी?पदाधिकार्‍यांची निवड मतदानाच्या माध्यमातून व्हावी, अशी राहुल गांधी यांची भूमिका असून, या विषयी त्यांचे स्पष्ट निर्देश असल्याचे मत राजेश भारती यांनी व्यक्त केले. पक्षात गटबाजीला उधाण आले असून, महानगराध्यक्षपदासाठी इच्छुक असणार्‍यांनी आधी एक होण्याची गरज असल्याचे विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांनी स्पष्ट केले. निवडणुकीच्या माध्यमातून पदाधिकार्‍याची निवड व्हावी, त्यासाठी बॅलेट पेपरचा वापर करावा, असे मत नगरसेवक डॉ. जिशान हुसेन यांनी मांडले. माजी महापौर सुरेश पाटील, सीमा ठाकरे यांनीसुद्धा निवडणुकीचा आग्रह लावून धरला. 

हम भी मन की बात कर ले!निवडणुकीसाठी पदाधिकारी आग्रही असल्याचे ध्यानात आल्यानंतर पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा आ. राजेश कुमार यांनी उपस्थित पदाधिकार्‍यांसोबत खासगीत चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली. ‘मोदी कि तरह हम भी मन की बात कर ले’ असे म्हणत त्यांनी बैठक गुंडाळली.

आज जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदासाठी बैठकआमदार राजेशकुमार हे दोन दिवसांच्या दौर्‍यावर आले असून बुधवारी अकोला जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदासाठी स्थानिक स्वराज्य भवन येथे पदाधिकार्‍यांसोबत संवाद साधणार आहेत.