अकोला : २९ वर्षांची परंपरा असलेला श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यासाठी राजराजेश्वर नगरी सज्ज झाली असून, शहरात सर्वत्र भगव्या पताका फडकत आहेत. गतवर्षीप्रमाणे यंदादेखील रामजन्मोत्सवात हजारोंच्या संख्येने रामभक्त सहभागी होणार असल्याची माहिती श्रीरामनवमी समितीच्या पदाधिकार्यांनी दिली. या ऐतिहासिक सोहळय़ात सर्व जाती आणि सर्व पंथाचे लोकं सहभागी होतात. गतवर्षी श्रीरामनवमी शोभायात्रा समितीद्वारा काढण्यात आलेल्या शोभायात्रेत २७ मंडळे सहभागी झाली होती. यंदा ही संख्या ३६ ने वाढली असून, यंदाच्या रामनवमी शोभायात्रेत ६३ चित्ररथ सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये यंदा श्रीरामनवमी शोभायात्रा समिती, विश्व हिंदू परिषद, राणीसती धाम, मोठय़ा राम मंदिराचे देखावे आणि चित्ररथ आकर्षण ठरणार आहेत.
रामजन्मोत्सवासाठी राजराजेश्वर नगरी सज्ज!
By admin | Updated: March 27, 2015 01:30 IST