शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे यांचे वक्तव्य केवळ प्रसिद्धीसाठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सध्या प्रसिद्धीचीच गरज आहे, त्यामुळे ते राज्यातील वीजबिलाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सध्या प्रसिद्धीचीच गरज आहे, त्यामुळे ते राज्यातील वीजबिलाच्या प्रश्नावर बेछुट आराेप करतात, असा टाेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे परिवार संवाद मेळाव्यासाठी रविवारी अकाेल्यात आले हाेते. यावेळी सकाळी त्यांनी जलसंपदा विभागाचा आढावा घेतला व नंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, वीजबिलाच्या प्रश्नावर राज्य सरकार गंभीर आहे. मात्र, एवढया महत्त्वाच्या विषयावर राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या घरी अदानी आले अन् वीजबिलाचा प्रश्न मागे पडला, असे विधान करणे हास्यास्पद असल्याचे पाटील म्हणाले. सध्या राज ठाकरे यांना प्रसिद्धीची नितांत गरज आहे त्यामुळेच त्यांनी असे विधान केले आहे, असा टाेलाही त्यांनी लगावला. सध्या दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदाेलन हे आणखी तीव्र झाले असून, त्या आंदाेलनाला पाठिंबा देण्यासाठीच शनिवारी केलेला चक्का जाम यशस्वी झाल्याचा दावा त्यांनी केला. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संवेदनशील नसल्याचा आराेपही त्यांनी केला. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाबाबत बदललेल्या परिस्थितीत तिन्ही पक्ष चर्चा करून निर्णय घेतील, असं म्हणत पाटील यांनी अध्यक्षपदाबाबतचे गुढ आणखी वाढवले. यावेळी अन्न औषध प्रशासन मंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे, आमदार अमाेल मिटकरी, आमदार नितीन देशमुख आदी उपस्थित हाेेते.

बाॅक्स

फडणवीसांचे विधान गांभीर्याने घेत नाही

विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सध्याच्या राज्य सरकारमध्ये विनाशिडीचे फासे पलटवू, असे विधान केले हाेते. या संदर्भात जयंत पाटील यांना विचारले असता, फडणवीस यांना एक व्यक्ती म्हणून मी गांभीर्याने घेताे मात्र त्यांचे विधान गांभीर्याने घेत नाही, असा टाेला लगावला.

बाॅकस

भाजप नेत्यांनी शहाणपणा शिकवू नये

इंधन दरवाढीवर केंद्राने कर कमी केल्यास दर नियंत्रणात येतील. केंद्र राज्याशी दुजाभाव करतं, अशावेळी भाजपच्या राज्यातील नेत्यांनी आम्हाला राज्याचे कर कमी करण्याचं शहाणपण शिकवू नये, असा टोला जयंत पाटील यांनी भाजपला लगावला. केंद्राने एक रूपया जरी कमी केला तर करात माेठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी सुनावले.