शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रायपूरच्या साखर व्यापाऱ्याची अकोल्यात २३ लाखांनी फसवणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 15:32 IST

खंडेलवाल याने तीन ते चार दिवसांमध्ये साखर पोहोचेल, असे त्यांना सांगितले; मात्र साखर न मिळाल्याने त्यांनी संतोष खंडेलवाल यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी टाळाटाळ सुरू केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रायपूर येथील एका व्यापाºयाकडून साखर विकण्याच्या व्यवहारासाठी अकोल्यातील व पुण्यातील एजंटने ३५ लाख ४८ हजार रुपये घेतले होते; परंतु साखर खरेदीचा व्यवहार न झाल्यामुळे दोन्ही एजंटने ८ लाख ३७ हजार ५00 रुपये परत केले. उर्वरित रकमेची मागणी केली असता, दोन्ही एजंट रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने, अखेर कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.रायपूर येथील नीरज रमेशलाल रमाजी यांच्या तक्रारीनुसार ते साखर विक्रीचा व्यवसाय करतात. बालाजी शुगर एजन्सीचे संचालक आरोपी संतोष मोहनलाल खंडेलवाल (अकोला) आणि अभय चोरडिया (पुणे) यांनी २0१४ मध्ये नीरज रमाजी यांच्यासोबत संपर्क साधून दोन टक्के कमिशन दराने साखर देत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्यात तीन वेळा साखर खरेदीचा व्यवहार झाला. त्यानंतर २0१६ मध्ये संतोष खंडेलवाल याने शंभू महादेव शुगर अ‍ॅण्ड अलाइड इंडस्ट्रीज, उस्मानाबाद येथून कमी दराने साखर खरेदी करून देण्याचे सांगितले. नीरज रमाजी यांनी विश्वास ठेवून अग्रिम रक्कम ३५ लाख ४८ हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केले. खंडेलवाल याने तीन ते चार दिवसांमध्ये साखर पोहोचेल, असे त्यांना सांगितले; मात्र साखर न मिळाल्याने त्यांनी संतोष खंडेलवाल यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी टाळाटाळ सुरू केली. तसेच संबंधित साखर कारखान्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी कोणताही व्यवहार झाला नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, त्यांनी आरोपीला रक्कम मागितली असता, आरोपीने २८ मार्च २०१७ रोजी ८ लाख ३७ हजार ५०० रुपये परत केले. त्यानंतर आरटीजीएसने २ लाख ५० हजार व धनादेश २५ डिसेंबर २०१८ ला दिला आणि उर्वरित २३ लाख ६० हजार ५०० रुपये देण्यासाठी अवधी मागितला. त्यानंतरही आरोपीकडून पैसे देण्यास टाळाटाळ होत असल्याने तक्रारदार नीरज रमाजी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेवर सुनावणी करताना, न्यायालयाने आरोपी संतोष खंडेलवाल, अभय चोरडिया यांच्याविरुद्ध भादंवि ४२०,४०९, ३४ नुसार गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)

टॅग्स :Akolaअकोलाfraudधोकेबाजी