शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा तोंडावर; मदत नाही!

By admin | Updated: May 1, 2016 01:28 IST

अकोला जिल्हय़ातील दुष्काळग्रस्त शेतकरी हवालदिल: मदतीची प्रतीक्षा.

संतोष येलकर/ अकोलादुष्काळी परिस्थितीत जिल्हय़ातील सर्व गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली; मात्र दुष्काळी परिस्थितीत हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांसाठी शासनामार्फत अद्याप मदत निधी उपलब्ध झाला नाही. पावसाळा तोंडावर आला असला तरी दुष्काळी मदतीचा पत्ता नाही. त्यामुळे दुष्काळी मदत केव्हा मिळणार, याबाबत जिल्हय़ातील दुष्काळग्रस्त ९४२ गावातील शेतकर्‍यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, नापिकीमुळे जिल्हय़ात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. खरीप पिकांच्या नजरअंदाज पैसेवारीनुसार जिल्हय़ातील लागवडीयोग्य एकूण ९९७ गावांपैकी ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या बाळापूर तालुक्यातील १५ आणि तेल्हारा तालुक्यातील ३५ अशी केवळ ५५ गावे गत ऑक्टोबरमध्ये शासनामार्फत दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली. या दुष्काळग्रस्त गावांसाठी शासनामार्फत मदतनिधीदेखील प्राप्त झाला. त्यानंतर खरीप पिकांच्या अंतिम पैसेवारीनुसार ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या राज्यातील गावांमध्ये गत २३ मार्च रोजीच्या शासन निर्णयानुसार दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अकोला जिल्हय़ातील ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या लागवडीयोग्य सर्व ९९७ गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली. दुष्काळी जाहीर होऊन महिना उलटून गेला; मात्र दुष्काळग्रस्त गावांमधील शेतकर्‍यांसाठी शासनामार्फत अद्यापही मदत जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे संकटात सापडलेल्या जिल्हय़ातील ९४२ गावांमधील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी मदत निधी अद्याप उपलब्ध झाला नाही. हवामान वेधशाळांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार यावर्षी पावसाळा लवकर सुरू होणार आहे. त्यानुसार पावसाळा महिनाभरावर आला असून, दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांसमोर खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतीची मशागत, बियाणे, खतांचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळा तोंडावर आला असला तरी, शासनाकडून दुष्काळी मदत अद्याप मिळाली नाही. त्यामुळे दुष्काळी मदत केव्हा मिळणार, याबाबत जिल्हय़ातील दुष्काळग्रस्त गावांमधील शेतकर्‍यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.