शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा दिवस

By admin | Updated: August 31, 2014 23:53 IST

गत दोन दिवसापासून बुलडाणा जिल्ह्यात संततधार पाऊस : सरासरी २१.९८ टक्के पावसाची नोंद.

बुलडाणा : ऑगस्टमध्ये शेवटच्या आठवड्यात पडलेल्या सामाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी वाढली आहे. गत दोन दिवसापासून बुलडाणासह चिखली, सिंदखेडराजा, मेहकर, मलकापूर, मोताळा, लोणार, शेगाव, खामगाव, जळगाव जा. तालुक्यात दमदार पाऊस सुरु आहे. या पावसाच्या दिवसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. शिवाय पिकांनाही नविन जिवदान मिळाले आहे. जिल्ह्यात महिनाभरापासुन दडी मारलेल्या पावसाने २३ जुलैपासुन आगमन झाले. २५ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजेपर्यंंंत नोंदविला पाऊस हा ४१ टक्के ऐवढा होता. मात्र २८ ऑगस्टपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाने जोर धरला तो ३१ ऑगस्टपर्यत कायम आहे. गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसाची एकूण सरासरी २१.९८ ऐवढी नोंदवीला केली. तर आजपर्यत एकूण पाऊस ३२७.0७ मी.मी असून त्याची सरासरी ३८३ एवढी नोंदविली गेली आहे.यंदाच्या पावसाने उशीरा हजेरी लावल्याने लाखो हेक्टरवरील खरीप पेरण्या लांबल्या होत्या. शेतकरीही चिंताग्रस्त झाला होता. या पेरण्या कशाबशा पुर्ण झाल्यावर जुलै महिन्यात व ऑगस्टच्या पहिल्या पंधरवाड्यात पावसाने दिर्घकाळ उघडीप दिली. यामुळे लाखो हेक्टरवरील खरीप पिके धोक्यात आली होती. मात्र ऑगस्टच्या दुसर्‍या पंधरवाड्यात सुरु झालेल्या व अजूनही सुरु असलेल्या नियमित पावसाने पिकांना पुन्हा जिवदान मिळाले आहे. मात्र गत वर्षी ऑगस्टमध्ये सरासरी ९९0६.३७ एवढा पाऊस पडला होता. मात्रया तुलनेत व वार्षिक सरासरी पर्जन्यमान लक्षात घेतले तर आज ३१ ऑगस्ट अखेरपर्यत सरासरी ३२७.0७ एवढाचा पाऊस पडला आहे. हा पाऊस जिल्ह्यासाठी अपुराच असल्याचे चित्र स्पष्ट आहे.*मोताळा तालुक्यात पाऊस; जनजीवन विस्कळीत मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे, पिंपळगाव देवी, शेलापूर, पिंप्रीगवळी, रोहिणखेड, बोराखेडी व कोथळीसह तरोडा, कुर्‍हा-गोतमारा, लिहा परिसरात काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. या पावसामुळे कापूस,सोयाबीन, मका व कडधान्यांना जीवदान मिळणार असून, मोताळा-बोराखेडी परिसरातील नदय़ांना या पावसाळय़ात पहिल्यांदाच पूर आला आहे. त्यामुळे बोराखेडी व मोताळा परिसरातील नदय़ा दुथडी भरून वाहत आहेत. मागील आठवड्यापासून तालुक्यात पावसाने सुरूवात केली. गेल्या २४ तासात १९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात आतापर्यंंत ३१९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.