शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

प्रदीर्घ खंडानंतर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन

By रवी दामोदर | Updated: September 5, 2023 23:16 IST

जिल्ह्यात गत दीड महिन्याच्या प्रदीर्घ खंडानंतर मंगळवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली.

अकोला : जिल्ह्यात गत दीड महिन्याच्या प्रदीर्घ खंडानंतर मंगळवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी सुखावला असून, कोमजलेल्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. जिल्ह्यात रात्रीच्या वेळी दमदार पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांच्या मशागतीला वेग येणार आहे.

खरिपाच्या पेरण्या एक महिना उशिरा प्रारंभ होऊन पेरण्या पूर्ण होताच जुलैच्या अखेरीस चांगला पाऊस झाला. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिके संकटात सापडली होती. दि.५ सप्टेंबर रोजी रात्रीच्यावेळी पावसाने विजांच्या कडकडाटात दमदार हजेरी लावल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे. जिल्ह्यातील आगर, उगवा, घुसर, खरप, तसेच मूर्तिजापूर तालुक्यातील कंझारा परिसरात जोरदार पाऊस झाला.

९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’

मध्य पूर्व बंगालच्या उपसागरात ४.५ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्याच्या प्रभावाने ९ सप्टेंबरला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात दि. ९ सप्टेंबरपर्यंत हलका ते मध्यम, तसेच तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने आगामी चार दिवस जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे.