शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने लाखो हेक्टरवरील कापूस भिजला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 15:25 IST

अगोदरच कापसाचे उत्पादन घटले आहे. पुन्हा हे नवे संकट उभे ठाकल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

- राजरत्न सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : निसर्गाच्या लहरीपणाचा पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला असून, शेतकऱ्यांवर हीसंकटाची मालिकाच सुरू आहे. गत दोन दिवसांपासून पुन्हा अवकाळी पाऊस पडत असल्याने लाखो हेक्टर शेतातील कापूस भिजला आहे. अगोदरच कापसाचे उत्पादन घटले आहे. पुन्हा हे नवे संकट उभे ठाकल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.यावर्षी राज्यात ४२ लाख हेक्टरवर कापूस पेरणी झाली आहे; परंतु सुरुवातीला कमी पाऊस झाल्याने पेरणीस विलंब झाला. हे पीक परिपक्वतेच्या अवस्थेत असतानाही सतत पाऊस सुरू होता. त्याचा परिणाम कापूस उत्पादनावर झाला असून, उतारा घटला आहे. सध्या कापूस वेचणी सुरू आहे; पण पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. गत चोवीस तासांत गुरुवार, २६ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजतापर्यंत विदर्भात बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. मध्य महाराष्टÑ व मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडला आहे. या पावसाने कापूस पीक तर भिजलेच तूर पिकावरही परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.विदर्भात १७ लाख ४९ हजार ९५ हेक्टरवर कापूस पेरणी झाली आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला असून, कापूस पीक भिजले आहे. त्यामुळे कापसाची प्रत खराब होणार असल्याने भिजलेला कापूस ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतंत्र व्यवस्था करावी लागणार आहे. शासकीय कापूस खरेदी केंद्रावर अगोदरच ८ टक्के आर्द्रता व इतर निकष लावून कापूस खरेदी केला जात आहे. त्यामुळे भिजलेला कापूस व्यापाºयांनाच विकावा लागणार असल्याने भाव किती मिळतात, हा प्रश्न शेतकºयांसमोर उभा ठाकला आहे. अकोला जिल्ह्यात बुधवारी रात्री १२ ते २.३० वाजतापर्यंत बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. त्यामुळे या जिल्ह्यातील कापूस चांगलाच भिजला आहे.या सर्व विषम वातावरणामुळे कीड, रोगाचा प्रादुर्भावही वाढला असून, कपाशीवर गुलाबी बोंडअळी तर तुरीवर शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तूर पीक यावर्षी बºयापैकी आले आहे; परंतु निसर्गाच्या लहरीपणाचा फटका या पिकालाही बसत आहे.शेतकºयांनी काळजी घेण्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून देण्यात येत असल्याचे कृषी विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. एम. मानकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती