शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दुस-या दिवशीही अवकाळी पाऊस

By admin | Updated: March 28, 2016 01:49 IST

वादळी वा-यासह गारपीट : पातूर, आकोट तालुक्यात जोरदार पाऊस; वीज कोसळून एक ठार.

अकोला/बोरगाव मंजू: जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अकोला तालुक्यात सिसा बोंदरखेड येथे शेतात वीज कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला. पातूर तालुक्यात आलेगाव येथे गारपीट झाली असून, तेल्हारा तालुक्यात हिवरखेड येथे वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. या पावसाने रब्बी पिकांचे नुकसान झाले. आठवडाभर कडक उन्हाचा सामना करणार्‍या अकोलेकरांना शनिवारपासून अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शनिवारी सायंकाळपासून अनेक भागांमध्ये वादळी वार्‍यासह हलक्या सरी कोसळल्या. दुसर्‍या दिवशीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारपासूनच वातावरण ढगाळ झाले होते. त्यानंतर काही भागात वादळी वार्‍यासह पाऊस कोसळला. अकोला शहरात कौलखेड परिसरातील वर्धमाननगरमध्ये बाळू मोहड यांच्या घरावर वीज कोसळली. त्यामुळे जीन्याचा टॉवर तुटला. तेल्हारा तालुक्यात हिवरखेड येथे दुपारी वादळी वार्‍यासह पाऊस झाला. पातूर तालुक्यात अनेक ठिकाणी दुपारपासून अधूनमधून वादळी वार्‍यासह पावसाच्या सरी कोसळल्या. शिर्ला येथे जोरदार पाऊस झाला. आलेगाव परिसरात दुपारी गारपीट झाल्याने पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. अकोला शहरातही काही परिसरात दुपारी हलकी सर येऊन गेली. मूर्तिजापूर शहरात दुपारच्या वेळी पाऊस झाला. बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिसा बोंदरखेड येथील शेतकरी किशोर नागोराव वडतकार (३५) हे आपल्या शेतात मशागतीकरिता बैलगाडी घेऊन गेले होते. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. त्यामुळे किशोर वडतकार हे बैलगाडी जुंपून घरी परत येण्यास निघाले. वाटतेच काळाने त्यांच्यावर झडप घातली. वीज अंगावर कोसळल्याने त्यांच्या बैलगाडीतच मृत्यू झाला. यानंतरही बैलगाडी घरापर्यंत आली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने सवरेपचार रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच अकोल्याचे तहसीलदार राजेश्‍वर हांडे, तलाठी हरिहर निमकंडे, ठाणेदार भास्कर तवर, जमादार अरुण गावंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. किशोर वडतकार यांच्याकडे एक एकर शेत असून, त्यांच्या पश्‍चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.