शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस लांबला; भाजीपाला महागला

By admin | Updated: June 28, 2014 22:38 IST

पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील भाजीपाला करपला असून, आवक घटली आहे.

बुलडाणा: दररोजच्या जेवणातील भाजीपाला चांगलाच महागला आहे. पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील भाजीपाला करपला असून, आवक घटली आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या महागाईने उच्चांक गाठल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. पाऊस न झाल्यास हे दर आणखी वाढतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.जूनचा अखेरचा आठवडा सुरू झाला तरी पावसाचा पत्ता नाही. पिकांना देण्यासाठी पाणी नाही आणि पाऊस नाही. त्यामुळे नवीन लागवड झाली नाही. परिणामी आवक एकदम घटली. मध्यंतरी भाजीपाल्याचे दर घसरले होते. दर इतके घसरले की भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली होती. परंतु सध्या बाजारात भाजीपाला येत नाही. भाजीपाला येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. दहा शेतकर्‍यांकडून हा माल जमा करावा लागतो. पाणी कमी पडल्याने करपलेला भाजीपाला बाजारात येत असून, तो लवकर खराब होतो. त्यामुळे नासाडी गृहीत धरून किरकोळ विक्रेते भाजीपाला खरेदी करतात. आवक नाही. त्यात नासाडी वाढली असून, साठविणे अशक्य आहे. आवक घटल्यास भाजीपाल्याचे दर आपोआप वाढत असतात. त्यानुसारच हे दर वाढत असून, भाजीपाला कडाडला आहे. पाऊस न पडल्यास हे दर आणखी वाढतील,असे भाजीपाला व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. शहरासह जिल्ह्यातून होणारी भाजीपाल्याची आवक घटली आहे. इतर शहरांतून भाजीपाला आवक केल्यास त्याचे दर अधिक असतात. त्यामुळे तेही परवडत नाही. शहरातील भाजी बाजारामध्ये शेतकरी सकाळी भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येतात. व्यापार्‍यांकडून लिलाव करण्यात करण्यात येतो. लिलावासाठी शहरातील किरकोळ व्यापारी सकाळी दाखल होतात. व्यापार्‍यांकडून घेतलेला भाजीपाला किरकोळ विक्रेते शहरातून फिरतात. तसेच काही चौकात बसूनही भाजी विक्रीचा व्यवसाय करत आहेत.त्यांच्यामार्फत शहरात भाजीपाला थेट ग्राहकांपयर्ंत पोहोचविला जातो.