शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

रोहिणी नक्षत्राच्या पूर्वसंध्येला पाऊस!

By admin | Updated: May 26, 2017 03:04 IST

समाधानकारक पावसाचे संकेत; आजपासून रोहिणी नक्षत्रास प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रोहिणी नक्षत्राच्या पूर्वसंध्येला अकोला शहर आणि परिसरात पावसाने हजेरी लावली. समाधानकारक पावसाचे हे संकेत असल्याचे शेतकऱ्यांमध्ये मानले जात आहे. शुक्रवार, २६ मेपासून रोहिणी नक्षत्राला प्रारंभ होत आहे.रोहिणी नक्षत्राच्या पूर्वसंध्येवर अकोला व परिसरात ढगाळ वातावरण निर्मिती होऊन सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. हा पाऊस शेतकऱ्यांसाठी सुखद संदेश घेऊन आल्याची चर्चा शहरानजीकच्या शेतकऱ्यांमध्ये आहे.दरम्यान, परंपरेनुसार आजपर्यंत शेतकरी या नक्षत्रानुसार शेतीचे नियोजन करीत असतो. त्यानुसार रोहिणी नक्षत्र शुक्रवार, २६ मे रोजी सकाळी ०५:४४ ला सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्याचे वाहन हत्ती आहे. या नक्षत्रात आकाश ढगाळ राहील व उन्हाळा वाढण्याची शक्यता आहे. ८ मे रोजी मृग नक्षत्रास सुरुवात होईल. या नक्षत्राचे वाहन हे मेंढा आहे. २१ मे रोजी आर्द्रा नक्षत्र लागणार असून, या नक्षत्राचे वाहन म्हैस असल्याचे सांगितले जात आहे. ५ जुलै रोजी पुनर्वसू नक्षत्रास सुरुवात होणार असून, या नक्षत्राचे वाहन हे कोल्हा आहे. १९ जुलै रोजी पुष्य नक्षत्र लागणार आहे, त्याचे वाहन उंदीर असून, २ आॅगस्ट रोजी आश्लेष नक्षत्र लागेल. त्याचे वाहन घोडा आहे. १६ आॅगस्ट रोजी मघा नक्षत्रास सुरुवात होणार आहे.३० रोजी पूर्वा नक्षत्र वाहन - गाढव, १३ सप्टेंबर रोजी उत्तरा नक्षत्र वाहन - बेडूक, २६ सप्टेंबर रोजी हस्त नक्षत्र वाहन -उंदीर, १० आॅक्टोबर रोजी चित्रा नक्षत्र वाहन - घोडा, तर २३ आॅक्टोबर रोजी स्वाती नक्षत्र वाहन लागणार आहे.