अकोला : अकोला रेल्वे स्थानकावरील मूलभूत सेवांकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांची कोंडी होत आहे. रेल्वे प्रशासनाने त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.रेल्वे स्थानकावरील नवीन फूट ओव्हर ब्रीजचे काम असल्याने येथे प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरील शौचालय पाडण्यात आले आहे. या प्लॅटफॉर्मच्या पश्चिम दिशेत नवीन शौचालय बांधण्यात आले; मात्र त्यासंदर्भात सूचना नसल्याने प्रवाशांची कोंडी होत आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळातील अकोला गणमान्य स्थानकापैकी एक आहे. त्यात अधिक प्रगती म्हणून येथे रेल्वे ओव्हर फुटब्रीजचे बांधकाम सुरू झाले आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक एकपासून सुरू होणारा हा नवीन फु ट ओव्हर ब्रीज प्लॅटफॉर्म क्रमांक पाचपर्यंत विस्तारला जाणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी होत असलेल्या या ब्रीजच्या बांधकामामुळे मात्र पूर्वीचे शौचालय तोडण्यात आले आहे.