शेगाव (जि. बुलडाणा) : शेगाव विकास आराखड्यांतर्गत येथील रेल्वे स्थानकावर उभारण्यात येणार्या अतिरिक्त पादचारी पुलावर गर्डर ठेवण्यासाठी बुधवारी सकाळी ६ ते ९ या कालावधीत मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होता. शहरातील रेल्वे स्थानकाच्या एकमेव पादचारी पुलाला समांतर दुसरा पूल उभारण्याचे काम शेगाव विकास आराखडा अंतर्गत सुरू आहे. बुधवारी या पुलावर गर्डर टाकण्याचे काम भुसावळचे विभागीय व्यवस्थापक सुभीकुमार गुप्ता यांच्या देखरेखीखाली करण्यात आले. यावेळी नागपूरहून मुंबईकडे जाणार्या सर्व रेल्वे गाड्या सकाळी ६ ते ९ या कालावधीत थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. सकाळी ९ वाजता हा मार्ग पूर्ववत करण्यात आला. यावेळी वरिष्ठ अभियंता राजेश चिखले, ए.एम. टेकाडे, मंडळ यांत्रिक अभियंता एस.एस. पवार, सी.डी. पवार, पुलाचे कार्य अभियंता एस.के. शेवले, स्टेशन प्रबंधक ए.डब्ल्यू. देशमुख, मोहन देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. हे काम करण्यासाठी जवळपास तीन तास हा रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती.
रेल्वे वाहतूक तीन तास बंद
By admin | Updated: December 24, 2015 02:48 IST