शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गुटख्याच्या पाच अड्डय़ांवर छापेमारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:59 IST

शहरातील मुख्य बाजारपेठेसह रजपूतपुरा येथे  गुटखा माफियांच्या घरातील गुटखा साठय़ावर जिल्हा  पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष  पथकाने गुरुवारी दुपारी छापेमारी केली. या छापेमारीत  पाच गुटखा अड्डय़ांवर धाडी टाकण्यात आल्या असून,  तब्बल आठ लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात  आला आहे.

ठळक मुद्देआठ लाखांचा गुटखा जप्तविशेष पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील मुख्य बाजारपेठेसह रजपूतपुरा येथे  गुटखा माफियांच्या घरातील गुटखा साठय़ावर जिल्हा  पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष  पथकाने गुरुवारी दुपारी छापेमारी केली. या छापेमारीत  पाच गुटखा अड्डय़ांवर धाडी टाकण्यात आल्या असून,  तब्बल आठ लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात  आला आहे.राज्यात गुटखाबंदी केल्यानंतरही शहरासह जिल्हय़ात  गुटख्याची मोठय़ा प्रमाणात छुप्या मार्गाने वाहतूक आणि  खरेदी-विक्री सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम.  राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज  अळसपुरे यांना गुरुवारी मिळालेल्या माहितीच्या आधारे  त्यांनी गुटखा माफिया घनश्याम सीताराम अग्रवाल  याच्या जुना भाजी बाजारातील जगदंबा सुपारी स्टोअर्स  येथे छापा टाकून, या ठिकाणावरून गुटख्याचा साठा  जप्त केला. त्यानंतर चमन सीताराम अग्रवाल याच्या  मालकीच्या अंबिका ट्रेडर्स येथे धाड टाकून गुटखा साठा  जप्त करण्यात आला. तिसरी कारवाई चंद्रनारायण  लालचंद अग्रवाल याच्या भगवती सुपारी या दुकानावर  करून, गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.  त्यानंतर नितीन लालचंद अग्रवाल याच्या मालकीच्या  भगवती ट्रेडर्स येथे छापा टाकून विशेष पथकाने गुटखा  साठा जप्त केला. या चार ठिकाणांवर कारवाई सुरू  असतानाच घनश्याम अग्रवाल याच्या निवासस्थानी  गुटखा साठा असल्याची माहिती मिळताच विशेष प थकाचे प्रमुख व कर्मचार्‍यांनी रजपूतपुरा येथील घनशाम  अग्रवाल याच्या निवासस्थानी छापा टाकून गुटखा साठा  जप्त केला. या पाच गुटखा अड्डय़ावर छापेमारी करीत  आठ लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला  असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे.  यामध्ये दोन ठिकाणी घनश्याम अग्रवाल या एकाच गुट खा माफियाचा गुटखा ठेवण्यात आल्याचे समोर आले.  ही कारवाई विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे व  त्यांच्या पथकाने केली.