शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे आमिष देऊन फसविणार्‍याच्या घरावर छापेमारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:46 IST

अकोला : समाजकल्याण विभागामध्ये लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविणार्‍या यवतमाळ जिल्हय़ातील दारव्हा येथील शुद्धोधन तायडे या मुख्य सूत्रधाराच्या घरावर सिव्हिल लाइन पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापेमारी केली. या ठिकाणावरून पोलिसांनी समाजकल्याण विभागाचे बनावट शिक्के, जातीचे दाखले, बनावट कागदपत्रे आणि रोख ४0 हजार रुपये जप्त केले. शुद्धोधन तायडे फरार असून, सिव्हिल लाइनचे ठाणेदार अन्वर शेख त्याचा शोध घेत आहेत. 

ठळक मुद्देबनावट शिक्क्यांसह दस्तावेज जप्तदारव्हा येथे कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : समाजकल्याण विभागामध्ये लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविणार्‍या यवतमाळ जिल्हय़ातील दारव्हा येथील शुद्धोधन तायडे या मुख्य सूत्रधाराच्या घरावर सिव्हिल लाइन पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापेमारी केली. या ठिकाणावरून पोलिसांनी समाजकल्याण विभागाचे बनावट शिक्के, जातीचे दाखले, बनावट कागदपत्रे आणि रोख ४0 हजार रुपये जप्त केले. शुद्धोधन तायडे फरार असून, सिव्हिल लाइनचे ठाणेदार अन्वर शेख त्याचा शोध घेत आहेत. अकोल्यातील रहिवासी सचिन कुरई याला यवतमाळ येथील रहिवासी शुद्धोधन तायडे याने समाजकल्याण विभागामध्ये लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दिले. या आमिषाला बळी पडत सचिन कुरई याने तायडेसोबत नोकरी मिळविण्यासाठी तीन लाख रुपयांमध्ये व्यवहार पक्का केला. या व्यवहारानुसार कुरई याने नोकरीसाठी तायडे याला सुरुवातीला दोन लाख रुपयांची रक्कम दिली. यामध्ये कुरईसोबतच सागर गोक टे व आणखी एकाने म्हणजेच तीन जणांनी तायडेला तब्बल सहा लाख रुपयांची रक्कम दिली. त्यानंतर तिघांचीही दीड लाख रुपयांची रक्कम बाकी असल्याने शुद्धोधन तायडे याने तिघांनाही बनावट नियुक्तिपत्र देऊन उर्वरित दीड लाख रुपयांची मागणी केली; मात्र या प्रकरणामध्ये फसवणूक झाल्याचे सागर गोकटे याच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने सचिन कुरई व आणखी एकास हा प्रकार न सांगता त्यांच्याकडून उर्वरित दीड लाख रुपयांची रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. त्याने हा प्रयत्न स्वत:चे गेलेले दोन लाख रुपये काढण्यासाठी केला; मात्र नोकरी लावून देण्याच्या नावाखाली लुबाडणूक झाल्याचे सचिन कुरई याच्या लक्षात येताच त्याने सदर प्रकरणाची तक्रार २७ जुलै रोजी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात केली. सिव्हिल लाइनचे ठाणेदार अन्वर शेख यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, तक्रार दाखल करून घेत आरोपींचा शोध सुरू केला. या प्रकरणातील सागर गोकटे या आरोपीस अटक केली. त्याची कसून चौकशी केल्यानंतर समोर आलेल्या माहितीच्या आधारे शुद्धोधन तायडे याच्या दारव्हा येथील घरावर छापा टाकला. या घरातून रोख ४0 हजार रुपये, समाजकल्याण विभागाचे बनावट दस्तावेज, शिक्के, शाळा सोडल्याचे बनावट प्रमाणपत्र पोलिसांनी हस्तगत केले आहे. यावरून सदर रॅकेटमध्ये आणखी मोठी नावे समोर येणार असल्याची माहिती आहे.