शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर हेड कॉन्स्टेबल गजाआड

By admin | Updated: July 7, 2015 01:41 IST

पोलीस कारवाई टाळण्यासाठी मागितले होते ५0 हजार रुपये.

अकोला : पतीने पत्नी व तिच्या माहेरकडील नातेवाईकांविरुद्ध दिलेल्या तक्रारीनुसार, पोलीस कारवाई न करण्यासाठी विवाहितेला ५0 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणार्‍या सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र रूपणे याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. मूर्तिजापूर तालुक्यातील एका विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, गत महिन्यात तिच्या पतीने तिच्या व माहेरकडील नातेवाईकांविरुद्ध कौटुंबिक वादातून मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीची चौकशी मूर्तिजापूर पोलीस ठाण्यातील तत्कालीन हेड कॉन्स्टेबल महेंद्र रूपणे यांच्याकडे देण्यात आली. विवाहिता व तिच्या नातेवाईकांविरुद्ध पोलीस कारवाई न करण्यासाठी महेंद्र रूपणे यांनी तिला ५0 हजार रुपयांची लाच मागितली. दरम्यान, रूपणे यांची सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात बदली झाली. त्यानंतरही रूपणे हे विवाहितेला लाचेची मागणी करीत होते. विवाहिता व हेड कॉन्स्टेबल रूपणे यांच्यात चर्चा झाली आणि चर्चेनंतर १0 हजार रुपये देण्याचे ठरले. १५ जून २0१५ रोजी विवाहितेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रूपणे यांची तक्रार केली. १६ जूनला रूपणे यांना अकोल्यातील नवीन बसस्थानकावर पैसे देण्याचे ठरले. दरम्यान, याठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी सापळा रचला होता. रूपणे हे बसस्थानकावर आले. तक्रारकर्त्या विवाहितेस भेटले आणि विवाहितेला बसस्थानकाच्या कॅन्टीनमध्ये बसण्यास सांगून मोटारसायकल पार्किंगमध्ये लावण्याचे सांगून बाहेर गेले. रूपणे यांना संशय आल्याने ते पुन्हा परत आले नाही. परंतु रूपणे यांच्याविरुद्धच्या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी व तपास केला. हेड कॉन्स्टेबल महेंद्र रूपणे यांच्याविरुद्ध सोमवारी कोतवाली पोलीस ठाण्यात कलम ७ लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली. मंगळवारी रूपणे यांना न्यायालयात हजर करण्यात येईल.