शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

रा.काँ. महानगर अध्यक्ष तापडिया यांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:04 IST

अकोला : राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष अजय तापडिया यांनी गुरुवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. पक्षानेही हा राजीनामा तातडीने मंजूर केला असून, महानगर जिल्हाध्यक्ष पदाचा प्रभार राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजू मुलचंदानी यांच्याकडे दिला आहे. महापालिका निवडणुकांमध्ये झालेल्या तिकिट वाटपातील आरोप-प्रत्यारोपाला कंटाळून तापडिया यांनी हा राजीनामा दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पक्षबांधणीसाठी ऑगस्टमध्ये अकोला दौर्‍यावर येत आहेत, त्यानिमित्ताने पक्षांतर्गत मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत.

ठळक मुद्देअंतर्गत कलहाचा परिणाम मुलचंदानींकडे पदभार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष अजय तापडिया यांनी गुरुवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. पक्षानेही हा राजीनामा तातडीने मंजूर केला असून, महानगर जिल्हाध्यक्ष पदाचा प्रभार राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजू मुलचंदानी यांच्याकडे दिला आहे. महापालिका निवडणुकांमध्ये झालेल्या तिकिट वाटपातील आरोप-प्रत्यारोपाला कंटाळून तापडिया यांनी हा राजीनामा दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पक्षबांधणीसाठी ऑगस्टमध्ये अकोला दौर्‍यावर येत आहेत, त्यानिमित्ताने पक्षांतर्गत मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत.मध्यंतरी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे अकोल्यात येऊन गेल्यात. राष्ट्रवादीतील पक्षबांधणीनिमित्त प्रथमच त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांंशी संवाद साधला. त्यावेळी अकोल्यातील कार्यकर्त्यांंंनी महानगरपालिकेतील तिकिट वाटपात अन्याय झाल्याचा गंभीर आरोप केला. महिला महानगर जिल्हाध्यक्ष मंदा देशमुख यांनीदेखील आपले कुणी ऐकून घेतले नसल्याचे सांगितले. या सर्व घटनांची गंभीर नोंद घेऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना गुरुवारी मुंबईत बोलाविण्यात आले होते. अकोल्यातील पाच पदाधिकार्‍यांनी गुरुवारी प्रदेशाध्यक्षांची भेट घेतल्यानंतर तापडिया यांनी मुंबईतच तडकाफडकी राजीनामा दिला. दरम्यान, याबाबत अजय तापडिया यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. राष्ट्रवादीची पक्षबांधणी मजबूत करण्यासाठी खा. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे दौरे राज्यभरात होत आहेत. अधिवेशनानंतर अजित पवार अकोल्याला येणार आहे. त्याआधी महानगराची कार्यकारिणी शक्तिशाली करण्याच्या दिशेने पक्षाने टाकलेले हे पाऊल असल्याचे बोलले जाते.

अपयशाला    जबाबदार नाही!

महानगरपालिकेच्या निवडणुकीतील तिकिट वाटपात पक्ष निरीक्षक आणि पदाधिकार्‍यांनी आपणास दूर ठेवले. महापालिकेत पक्षाला आलेल्या दारुण अपयशाला आपण जबाबदार नाही. तरीही पक्षाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत असल्याचे राजीनामा पत्रात अजय तापडिया यांनी म्हटले आहे.

तिकीट कापलेल्या मुलचंदानीकडे प्रभारतापडिया यांच्या राजीनाम्यानंतर महानगर जिल्हाध्यक्षाचा प्रभार कोणाकडे द्यावा, म्हणून राष्ट्रवादीच्या स्थानिक ज्येष्ठ नेत्यांना गुरुवारी मुंबई कार्यालयातून विचारणा केली. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजू मुलचंदानी यांच्या नावाबाबत मत विचारले असता, अनेकांनी सहमती दर्शविली. त्यामुळे मुलचंदानींकडे प्रभार सोपविला गेला आहे. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीत मुलचंदानी यांचे तिकिट कापले गेले होते. त्याच मुलचंदानीं यांचेकडे आता महानगराचा प्रभार आला आहे.