शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खुले नाट्यगृहासमोरील दुकाने जमीनदोस्त

By admin | Updated: December 29, 2014 02:05 IST

रात्री १0 वाजताच्या सुमारास अतिक्रमण निर्मूलन पथकाची कारवाई.

अकोला : डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहासमोरील अतिक्रमित दुकाने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जमीनदोस्त केली. रविवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास अतिक्रमण निर्मूलन पथकाने दुकाने तोडण्यास सुरुवात केली. एका तासामध्ये पथकाने खुले नाट्यगृहापासून ते न्यू क्लॉथ मार्केटच्या श्रीरामद्वारपर्यंतची जवळपास १२ दुकाने पाडून टाकली. पथकाची कारवाई पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली. होती. खुले नाट्यगृहालगत नझूलच्या जागेवरील १२ दुकानांच्या भाडेपट्टय़ाची मुदत संपल्यामुळे ती जमीनदोस्त करण्याचा निर्णय मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी घेतला. दुकाने खाली करण्याचे फर्मान उपायुक्तांनी सोडल्यानंतर संबंधित व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली. कारवाई टाळण्यासाठी विदर्भ चेंबर ऑफ कॉर्मससह विविध व्यापारी संघटनांनी बैठकी घेतल्या, परंतु बैठकींमधील चर्चा निष्फळ ठरल्याने अखेर महापालिकेच्या रविवारी रात्री गजराजने दुकानांवर पंजाने आघात करून दुकाने पाडण्यास सुरुवात केली. नझूल विभागाच्या अखत्यारीत असलेल्या शिट नं.३९ - डी, प्लॉट क्र.८१/२ वर खुले नाट्यगृह बांधणीसाठी परवानगी देण्यात आली. यामध्ये पश्‍चिम भागात ३४६.५ चौ.मी. क्षेत्रफळाचा, शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता, व्यावसायिक दुकानांसाठी वापर करण्यात आला होता. तत्कालीन नगरपालिका प्रशासनाने या जागेवर भाडेपट्टय़ाने १२ दुकाने उभारण्यास संमती दिली होती. भाडेपट्टय़ाची मुदत संपल्यावरदेखील संबंधित व्यावसायिकांनी जागा रिक्त केली नाही. ही जागा दुकानांसाठी नियमित करण्यासाठी संबंधित व्यावसायिकांनी शासनाकडे परवानगी मागितली असता, ती नाकारण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी ही जागा रिक्त करण्याचे आदेश मनपा प्रशासनाने संबंधित व्यावसायिकांना दिले होते. त्यानुषंगाने उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी शनिवारी ही दुकाने खाली करण्याचे आदेश देताच, संबंधित व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. व्यापार्‍यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु महापालिका प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने तो हाणून पाडला आणि एकापाठोपाठ एक दुकान पाडण्यास सुरूवात केली. अतिक्रमण तोडत असल्याची वार्ता शहरात पसरताच व्यापार्‍यांसह, नागरिकांनी खुले नाट्यगृहाजवळ गर्दी केली होती.