शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

खारपाणपट्ट्यात रब्बी ज्वारीचे क्षेत्र वाढणार -कुलगुरू भाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 13:48 IST

अकोला : शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न कसे वाढेल, यावर कृषी विद्यापीठाने लक्ष केंद्रित केले असून, खारपाणपट्ट्यात रब्बी ज्वारीचे क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणार असल्याचे आश्वासन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी शेतकऱ्यांना दिले.खारपाणपट्ट्यात शेती दिनाचे आयोजन करण्यात येत असून, चंडिकापूर ...

ठळक मुद्देखारपाणपट्ट्यात शेती दिनाचे आयोजन करण्यात येत असून, चंडिकापूर येथे सोमवारी शेती दिनाचे आयोजन करण्यात आले होते.संशोधन संचालक डॉ. व्ही.के. खर्चे, ज्वारी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. आर.बी. घोराडे, डॉ. शशांक भराड, डॉ. अनिल गुल्हाने, डॉ. व्ही.यू. सोनाळकर, डॉ. सीमा नेमाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अकोला : शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न कसे वाढेल, यावर कृषी विद्यापीठाने लक्ष केंद्रित केले असून, खारपाणपट्ट्यात रब्बी ज्वारीचे क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणार असल्याचे आश्वासन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी शेतकऱ्यांना दिले.खारपाणपट्ट्यात शेती दिनाचे आयोजन करण्यात येत असून, चंडिकापूर येथे सोमवारी शेती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी शेती व ज्वारी दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी संशोधन संचालक डॉ. व्ही.के. खर्चे, ज्वारी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. आर.बी. घोराडे, डॉ. शशांक भराड, डॉ. अनिल गुल्हाने, डॉ. व्ही.यू. सोनाळकर, डॉ. सीमा नेमाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यावेळी बोलताना डॉ. भाले यांनी ज्वारीचे वाढलेले महत्त्व विशद केले. ते म्हणाले, ज्वारी दिन साजरा करू न ज्वारी लागवडीबाबत शेतकऱ्यांमध्ये सकारात्मकता वाढावी, शेतकऱ्यांच्या शेतात घेतलेले प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरावे, यादृष्टीने कृषी विद्यापीठ काम करीत आहे. ज्वारी पिकांचा उत्पादन खर्च कमी असून, ज्वारीसोबतच कडबा असे दुहेरी पीक असल्याने नफा चांगला आहे. पीकेव्ही क्रांती हा रब्बीतील सरळ वाण असल्यामुळे शेतकरी स्वत:चे बियाणे तयार करू शकतो, त्यामुळे या पिकाकडे शेतकऱ्यांनी वळावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ