शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धाेक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:46 IST

अकोला : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धोक्यात सापडली आहेत. जिल्ह्यातील काही भागात हरभरा ...

अकोला : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धोक्यात सापडली आहेत. जिल्ह्यातील काही भागात हरभरा पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

शेतकऱ्यांना या वर्षी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. पहिल्यांदा पेरणीच्या वेळी दुबार-तिबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. त्यानंतर सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळ‌े सोयाबीनचे पीक हातचे गेले. भरवशाचे पीक असलेल्या कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली. शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही. त्यानंतर शेतकऱ्यांनी पैशांची उसनवारी करीत रब्बी हंगामाची तयारी करून पेरणी केली. सध्या शेतात पीक बहरलेले असताना गत दोन ते तीन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पीक धोक्यात सापडले आहे. रब्बी हंगामात उत्पन्न मिळेल, अशी आशा असताना ढगाळ वातावरणामुळे आशा धूसर होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

रब्बी हंगामात महत्त्वाचे असणारे हरभरा पीक सध्या जोमात बहरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यातील काही भागात हरभऱ्यावर फवारणी करताना शेतकरी दिसत आहे. हरभरा पिकावर आलेल्या या रोगामुळे रब्बी पीकही हातचे जाईल काय, या विवंचनेत शेतकरी आहेत. सद्य:स्थितीत काही भागातच हरभऱ्यावर रोग आला असून, कृषी विभागाने हरभऱ्यावर आलेल्या या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आवश्‍यक आहे.