शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राजेश्वर मार्गाची दुरवस्था; शिवसेना सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 13:50 IST

अकोला: श्रावण महिन्यात शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असली तरी मंदिरासमोरील मार्गाची अतिशय दुरवस्था झाल्यामुळे भाविकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, पालखी मार्गावरील पथदिवे बंद असल्याचा मुद्दा उपस्थित करीत शिवसेना सरसावली असून, यासंदर्भात प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी लावून ...

ठळक मुद्देजयहिंद चौक ते किल्ला चौक पर्यंतच्या मार्गावर ठिकठिकाणी खड्डेपालखी मार्गावरील पथदिवे बंद

अकोला: श्रावण महिन्यात शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असली तरी मंदिरासमोरील मार्गाची अतिशय दुरवस्था झाल्यामुळे भाविकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, पालखी मार्गावरील पथदिवे बंद असल्याचा मुद्दा उपस्थित करीत शिवसेना सरसावली असून, यासंदर्भात प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी लावून धरली आहे.हिंदू धर्मियांचा पवित्र महिना मानला जाणाºया श्रावण महिन्यात शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांची गर्दी उसळते. जयहिंद चौक ते किल्ला चौक पर्यंतच्या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, लोखंडी पुलावरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी पाहता पावसाळ््यापूर्वीच या रस्त्याची डागडुजी करणे अपेक्षित असताना महापालिका प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा मूग गिळून बसणे पसंत करते. यात भरीस भर किल्ला चौक ते जय हिंद चौक ते लोखंडी पुलावरील पथदिवे नादुरुस्त आहेत. राजेश्वर मंदिरात पहाटे ३ वाजतापासून भाविकांची रांग लागते. मुख्य रस्त्यांवर अंधार असल्यामुळे शिवभक्तांना त्रास सहन करावा लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करीत मनपातील शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा, प्रभागाच्या नगरसेविका मंजूषा शेळके यांनी रस्ता दुरुस्तीच्या संदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी लावून धरली आहे.रस्ता दुरुस्तीसाठी प्रशासनाच्या हालचालीजयहिंद चौक ते किल्ला चौक रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. सेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी मनपा आयुक्त अजय लहाने, शहर अभियंता इक्बाल खान यांच्यासोबत रस्ता दुरुस्तीसंदर्भात चर्चा केली. त्यावर प्रशासनाने रस्ता दुरुस्तीसाठी हालचाली सुरू केल्या असून, पथदिव्यांच्या संदर्भात विद्युत विभाग प्रमुख अमोल डोईफोडे यांना सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.