शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

वैरणाचा प्रश्न, गव्हांड्याचे भाव भिडले गगनाला

By admin | Updated: April 20, 2015 01:51 IST

सध्या शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या वैरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ अन्य पिकांचे कुटार नसल्याने गव्हांड्याच्या मागणीत वाढ झाली आहे़

सेवाग्राम : सध्या शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या वैरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ अन्य पिकांचे कुटार नसल्याने गव्हांड्याच्या मागणीत वाढ झाली आहे़ यामुळे गव्हांड्याचे भाव गगनाला भिडल्याचे दिसून येत आहे़जनावरांना पावसाळ्यापर्यंत पुरेल इतक्या चाऱ्याची व्यवस्था शेतकरी करतात़ यात कडबा, तूर, चणा, सोयाबीन आदींचे कुटार व थोड्या प्रमाणात गव्हांड्याचा समावेश असतो़ ग्रामीण भागात गव्हाचा पेरा राहत असल्याने सामान्यपणे गव्हांड्याला मागणी तशी नसते़ अनेक शेतकरी शेतातच गव्हाड्यांचे ढिग जाळून टाकतात़ ओळखीचे असल्यास मोफत दिले जात होते; पण गत दोन-तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणात शेतकरी साडला आहे़ यामुळे जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर झाला़ कुणी विचारत नसलेल्या गव्हांड्याला दोन ते चार हजार रुपये गोणा, असा भाव आज मिळत आहे़ यामुळे गव्हांड्याची मागणी वाढली असल्याचे ग्रामीण भागात दिसून येते़ विदर्भात जनावरांचा चारा गव्हांडा नव्हे तर कडबा, चना व तुरीचे कुटार होते़ दुधाळू जनावरांसाठी हिरवा चारा, मुख्य चारा कडबा आता शेतातूनच हद्दपार झाला आहे़ यामुळे गाई चारायाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे़ यांत्रिकीकरण वाढल्याने चाऱ्याचे संकट अधिक गडद झाले़ शिवाय सोयाबीन पेरणीमुळेही चारा संकट गंभीर झाले़ शेतकऱ्यांकडे आता चाराच नसल्याने गव्हांड्याशिवाय पर्याय नाही. जनावरांशिवाय शेती नसल्याने शेतकऱ्यांना अधिक रक्कम मोजून गव्हांडा खरेदी करावा लागत असल्याचे दिसते़(वार्ताहर)