शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

सरकारी बगिचा ते खोलेश्वर रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:05 PM

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत सिमेंट रस्त्याच्या ‘बेड’चे काम सुरू झाले असून, कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अकोला: शहरातील सर्वच सिमेंट रस्त्यांची पुरती ऐशीतैशी झाली असतानाच आता त्यामध्ये सरकारी बगिचा ते खोलेश्वर रस्त्याची भर पडणार असल्याचे चित्र आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत सिमेंट रस्त्याच्या ‘बेड’चे काम सुरू झाले असून, कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, रस्ता निर्मितीला अडथळा ठरणारे विद्युत पोल व आवारभिंतींचे अतिक्रमण अद्यापही कायम असल्याचे चित्र आहे. अशावेळी रस्ता उद्घाटनाचा गाजावाजा करणाऱ्या लोकप्रतिनिधींसह मनपातील भाजपचे पदाधिकारी व नगरसेवक आहेत तरी कोठे, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे.आमदार गोवर्धन शर्मा यांनी शहरातील सिमेंट रस्त्यांच्या कामांना प्राधान्य दिल्याचे दिसून येते. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करीत मोठ्या प्रमाणात निधी मिळविला आहे. शासनाने चार मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांसाठी १५ कोटींचा निधी दिला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पहिल्या टप्प्यात सरकारी बगिचा ते इंटक कार्यालय, दुसºया टप्प्यात इंटक कार्यालय ते चित्रा टॉकीजपर्यंत सिमेंट रस्त्यासाठी निविदा प्रकाशित करण्यात आली. ‘पीडब्ल्यूडी’ने २३ आॅगस्ट २०१८ रोजी या कामाची वर्कआॅर्डर जारी केली असता, रस्त्याच्या कामाला मे महिन्याच्या पूर्वार्धात सुरुवात करण्यात आली. या कामासाठी स्थानिक ‘आरआरसी’नामक कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून, सिमेंट रस्त्याचा ‘बेड’ अंथरण्याचे काम सुरू आहे. कामगारांमार्फत रस्ता तयार करण्याची एकूणच पद्धत लक्षात घेता या ‘बेड’च्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. रस्त्याचे काम सुरू झाले असले तरी अद्यापही रस्त्याच्या मधात विद्युत पोल कायम असून, त्याच्या अवतीभोवती सिमेंटचा थर अंथरल्या जात असल्याचा प्रकार दिसत आहे. 

पंधरा मीटर रुंद होईल रस्ता!

  •   सरकारी बगिचा ते इंटक कार्यालय- २६२ मीटर लांब, १ कोटी ८० लाखांची तरतूद
  •   इंटक कार्यालय ते खत्री मार्केट- २५८ मीटर लांब, १ कोटी ७० लाखांची तरतूद
  •   लक्झरी बस स्टॅन्ड ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल- ३०० मीटर लांब, ३ कोटींची तरतूद

रस्त्याची गुणवत्ता टिकेल का?यापूर्वी शहरात निकृष्ट ठरलेल्या सिमेंट रस्त्यांचा पूर्वानुभव लक्षात घेता, या रस्त्याच्या गुणवत्तेकडे सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देईल का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मोठ्या विश्वासाने रस्त्यांची कामे ‘पीडब्ल्यूडी’कडे सोपविली. अवघ्या सहा-सहा महिन्यांतच रस्त्यांची लागलेली वाट पाहता या विभागाची विश्वासार्हता शेवटच्या घटका मोजत असल्याचे बोलल्या जात आहे.प्रशासकीय यंत्रणांचा हवेत कारभाररस्त्यावरील विद्युत खांब हटविण्यासाठी ‘पीडब्ल्यूडी’ने मनपा तसेच महावितरणला पत्रव्यवहार केला. यावर मनपाचा कारभार अतिशय ढेपाळल्याचे चित्र असून, महावितरणकडून अद्यापही ‘इस्टिमेट’ तयार नसल्याची माहिती आहे. एकूणच, तीनही प्रशासकीय यंत्रणांचा हवेत कारभार सुरू असल्याचे ूिदसून येते.

रस्त्याच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी संबंधित अभियंत्यांची नियुक्ती केली आहे. विद्युत पोल, अतिक्रमण हटविण्यासंदर्भात मनपाला पत्र दिले आहे. रस्ता दर्जेदार करण्याचे निर्देश दिले आहेत.-सुरेश धिवरे, कार्यकारी अभियंता ‘पीडब्ल्यूडी’. 

 

टॅग्स :Akolaअकोलाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग