शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणाचा प्रश्न ऐरणीवर; प्रकल्प कार्यालय वाऱ्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 12:11 IST

अकोट तालुक्यातही कुपोषणाचे प्रमाण लक्षणीय आहे; मात्र याचे गांभीर्य बालविकास प्रकल्प कार्यालयाला नसल्याची बाब सोमवारी समोर आली.

- विजय शिंदे लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : लोकमत पोषण परिक्रमाच्या माध्यमातून राज्यभरातील कुपोषणाचा प्रश्न चव्हाट्यावर आणला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट या मेळघाटाच्या सीमेवर असलेल्या तालुक्यातही कुपोषणाचे प्रमाण लक्षणीय आहे; मात्र याचे गांभीर्य बालविकास प्रकल्प कार्यालयाला नसल्याची बाब सोमवारी समोर आली. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी सोमवारी दुपारी कार्यालयास भेट दिली असता, जबाबदार अधिकाऱ्यांसह एकही अधिकारी उपास्थित नसल्याचे दिसून आले. कार्यालयात केवळ एक परिचारिका हजर असल्याचे आढळले. या भेटीमुळे जिल्हा परिषद अंतर्गत असलेली एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयात कुपोषणाबाबत किती गंभीर आहेत, हे चित्र पाहावयास मिळत आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षांनी अधिकाºयांची झाडाझडती घेतली व शेरा नोंदविला.अकोट तालुका सातपुड्याच्या पायथ्याशी असल्याने मोठ्या प्रमाणात आदिवासीबहुल भाग आहे. या भागात कुपोषणाचे प्रभावक्षेत्र आहे. या भागातील अनेक मुले कुपोषणाच्या विळख्यात आहेत. अशा स्थितीत कुपोषणग्रस्त मुले व गर्भवती महिलांना सकस आहार पुरवण्याची जबाबदारी जिल्हा परिषदच्या आयसीडीएस अधिपत्याखाली अंगणवाडीवर आहे. त्यामुळे उपोषणाबाबतची माहिती आढावा घेण्याकरिता अचानक जिल्हा परिषदचे अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी अकोट येथील हिवरखेड मार्गावर असलेल्या कार्यालयात भेट दिली. यावेळी कार्यालयामध्ये जबाबदार अधिकारी- कर्मचारी गैरहजर आढळले. हजेरी रजिस्टर तपासले असता, सह्यासुद्धा आढळून आल्या नाहीत. अचानक जि.प अध्यक्ष आल्याची उपस्थित महिला कर्मचारी यांनी प्रकल्प अधिकारी व इतर कर्मचारी यांना माहिती देऊन बोलावले असल्याचे आढळले. यावेळी अध्यक्ष यांनी उपस्थित हजर असलेल्या एका कर्मचाºयाला धारेवर धरले. कोणकोण किती दिवसांपासून हजर नाहीत, सर्वच जण कुठे गेले, सह्या का केल्या नाहीत, कुपोषणाच्या माहितीचा तक्ता का नाही? आदी विविध प्रश्न विचारले. यावेळी उपस्थित कर्मचाºयांना समाधानकारक माहिती देता आली नाही. जि.प.अध्यक्षांनी हजेरी रजिस्टरवर नोंद करीत गैरहजेरीबाबत शेरा मारला. जिल्हा परिषद अध्यक्ष कार्यालयात आल्याची माहिती मिळताच अधिकारी-कर्मचारी धावत-पळत कार्यालयात आले; परंतु कार्यालयामध्ये कुठलेही नियोजन नसल्याने जिल्हा परिषद अध्यक्षांनी संताप व्यक्त केला. कुपोषणामुळे बालकांचा मृत्यू झाल्यास या कार्यालयाची जबाबदारी राहणार असल्याची तंबी त्यांनी दिली.

हे कर्मचारी आढळले गैरहजर जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी दिलेल्या भेटीत बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी (सां), पर्यवेक्षिका कनिष्ठ सहायक, वाहनचालक गैरहजर आढळले, तर कार्यालयात केवळ संध्या अलोकार या परिचारक हजर होत्या.

टॅग्स :akotअकोटAkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद