शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मायक्रो फायनान्सप्रकरणी तपासावर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: March 11, 2017 01:59 IST

केंद्राच्या अखत्यारीतील कंपन्यांचा गुन्हे शाखेकडून तपास.

संजय खांडेकरअकोला, दि. १0-विदर्भातील अनेक मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज वसुलीचा अतिरेक होत असून हजारो तक्रारींचा तपास अधांतरी सापडला आहेत्र. यासंदर्भात आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला असून दुसरीकडे विदर्भातील आणि अकोला गुन्हे शाखेची यंत्रणा संबंध नसलेल्या कार्यालयांची चौकशी करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मायक्रो फायनान्सप्रकरणी तपासावरच प्रश्नचिन्ह लागले आहेत.विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोदिंया या ११ जिल्हय़ातील हजारो महिला बचत गटांना खासगी मायक्रो फायनान्सने कोट्यवधींचे कर्ज वितरित केले. नोटाबंदीच्या दरम्यान कर्जाची वसुली करण्यासाठी कंपन्यांच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांकडून पठाणी पद्धत राबविण्यात आली. ग्रामिण परिसरातील गोरगरीब महिलांनी संबंधित जिल्हाधिकार्‍यांकडे हजारो तक्रारी नोंदविल्यात. यापैकी अकोल्यातही ३४४ तक्रारी नोंदवून महिलांनी एकत्रित येऊन मोर्चादेखील काढला; असाच प्रकार राज्यभर झाला. या प्रकाराची गंभीर दखल घेत आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न क्र. ७४00२ उपस्थित केला. त्यामुळे विदर्भातील पोलीस यंत्रणेकडून तपास सुरू झाला आहे. अकोल्यातील स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हा अग्रणी बँकेकडे याबाबत २८ मुद्यांभोवती सहा प्रश्नांची उत्तरे मागितली. मुळात पोलिसांकडून उपस्थित झालेले प्रश्न चुकीचे आणि त्यातही ज्या कार्यालयास ही विचारणा करण्यात आली ती कार्यालये देखील चुकली आहे. मायक्रो फायनान्सच्या सर्व आर्थिक व्यवहारांची मान्यता केंद्र शासनाच्या अखत्यारीतील आहे. राज्याचादेखील यामध्ये संबंध नाही. असे स्पष्टीकरण जिल्हा अग्रणी बँकेच्या सुत्रांनी दिले. जिल्हा अग्रणी बँकेने याबाबत स्पष्टपणे उत्तर दिल्याने आता चौकशी तरी कोठे करावी, याबाबत पोलिसांसमोर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.त्यामुळे मायक्रो फायनान्सप्रकरणी तपासावरच प्रश्नचिन्ह लागले आहेत.