शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएमसी’तील वसतिगृहात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 10:35 IST

हीच संधी साधत काही लोकांकडून मुलींचा पाठलाग अन् अश्लील चाळे करण्यासारखे प्रकार घडत आहेत.

अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याने विद्यार्थिनींना पाण्यासाठी रात्री वसतिगृहाबाहेर पडावे लागत आहे. हीच संधी साधत काही लोकांकडून मुलींचा पाठलाग अन् अश्लील चाळे करण्यासारखे प्रकार घडत आहेत. हा प्रकार येथील विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घातक ठरत असून, याकडे महाविद्यालय प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांसोबतच निवासी डॉक्टरांचे वसतिगृह आहेत. या वसतिगृहात इतर समस्यांसोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांकडून स्वतंत्र पर्यायी व्यवस्था करण्यात येत असली, तरी मुलींना पर्यायी व्यवस्था करणे परवडणारे नाही. म्हणूनच बहुतांश विद्यार्थिनी रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास अपघात कक्षाजवळीत हायजीन वॉटर सेंटर येथे जात असल्याचे निदर्शनास आले आहे. याच संधीचा लाभ घेत काही लोकांकडून या विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन होत असल्याचे धक्कादायक प्रकारही घडले आहेत; परंतु बदनामीच्या भीतीने विद्यार्थिनींकडून तक्रार केली जात नसल्याचे वास्तव आहे. दोन दिवसांपूर्वी असाच काहीसा प्रकार अपघात कक्ष परिसरात विद्यार्थिनींसोबत घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुलींच्या वसतिगृहात सुरक्षा रक्षकाने अश्लील चाळे केल्यानंतरचा हा प्रकार असून, याकडे महाविद्यालय प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. वसतिगृहातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागल्यास विद्यार्थिनींच्या सुरक्षेत वाढ करणे सोईस्कर होईल.सुरक्षेकडे दुर्लक्षविद्यार्थिनींना रात्रीच्या सुमारास पिण्याच्या पाण्यासाठी वसतिगृहाबाहेर पडावे लागते. अपघात कक्ष ते वसतिगृहादरम्यान रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची गर्दी, तसेच रिक्षा चालकांचीही गर्दी असते. या दरम्यान विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.प्रशासनाच्या मते वसतिगृहातील आरओ सुस्थितीतवसतिगृहातील पिण्याच्या पाण्यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला विचारणा केली असता, येथील आरओ सुस्थितीत असल्याचे सांगण्यात आले; परंतु यातील काही आरओ नादुरुस्त असल्याने विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे.वसतिगृहातील आराओ सुस्थितीत आहेत. ज्या ठिकाणी काही बिघाड झाले असतील, त्यांची दुरुस्ती दोन दिवसांत केली जाईल. शिवाय, परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यासही प्राधान्य देण्यात येत आहे.- संजीव देशमुख, प्रशासकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय