शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीचे अडकले चुकारे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:42 IST

टोकन देण्यात आलेल्या शेतकर्‍यांची हमी दराने तूर खरेदी गत ३१ ऑगस्टपासून बंद करण्यात आली आहे; मात्र गत महिनाभराच्या कालावधीत ३१ ऑगस्टपर्यंत अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ात खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे अडकले आहेत. त्यामध्ये अकोला व वाशिम या दोन जिल्हय़ात तूर खरेदीचे १६४ कोटी १६ लाख ७४ हजार रुपयांचे चुकारे अद्याप बाकी आहेत. 

ठळक मुद्देअकोला-वाशिम जिल्हय़ातील १६४ कोटींचे चुकारे बाकीशासनाकडून निधीची प्रतीक्षा!

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : टोकन देण्यात आलेल्या शेतकर्‍यांची हमी दराने तूर खरेदी गत ३१ ऑगस्टपासून बंद करण्यात आली आहे; मात्र गत महिनाभराच्या कालावधीत ३१ ऑगस्टपर्यंत अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ात खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे अडकले आहेत. त्यामध्ये अकोला व वाशिम या दोन जिल्हय़ात तूर खरेदीचे १६४ कोटी १६ लाख ७४ हजार रुपयांचे चुकारे अद्याप बाकी आहेत.  शासनाच्या अधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ‘नाफेड’द्वारे हमीदराने तूर खरेदी गत १0 जूनपासून बंद करण्यात आली होती. त्यानंतर खरेदी केंद्रांवर गत ३१ मेपर्यंत टोकन देण्यात आलेल्या शेतकर्‍यांची तूर बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत खरेदी करण्याचा निर्णय गत २१ जुलै रोजी शासनामार्फत घेण्यात आला. शासन निर्णयानुसार, ३१ ऑगस्टपर्यंत तूर खरेदीची मुदत होती. त्यानुसार टोकन देण्यात आलेल्या शेतकर्‍यांची तूर ३१ ऑगस्टपर्यंत खरेदी करण्यात आली. त्यामध्ये अमरावती विभागातील अकोला आणि वाशिम या दोन जिल्हय़ात २६ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत ३ लाख २५ हजार  ९२ क्विंटल तूर खरेदी करण्यात  आली. गत महिनाभराच्या कालावधीत अकोला व वाशिम या दोन जिल्हय़ात खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे १६४ कोटी १६ लाख ७४ हजार रुपयांचे चुकारे मात्र अद्यापही तूर विकलेल्या शेतकर्‍यांना मिळाले नाही. त्यामुळे विकलेल्या तुरीचे चुकारे केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

शासनाकडून निधीची प्रतीक्षा!खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे शेतकर्‍यांना वितरित करण्यासाठी शासनाकडून महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनला निधी उपलब्ध झाला नसल्याने, तूर खरेदीचे चुकारे रखडले आहेत. त्यानुषंगाने रखडलेले तुरीचे चुकारे शेतकर्‍यांना देण्यासाठी शासनामार्फत तुरीच्या चुकार्‍यापोटी निधी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फेडरेशनला केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा केली जात आहे.