शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मनपा करणार फॉगिंग मशीनची खरेदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:29 IST

अकोला : उशिरा का होईना, अखेर महापालिका प्रशासनाने धुरळणीसाठी फॉगिंग मशीन खरेदीचा निर्णय घेतला. मागील दहा वर्षांपासून हिवताप विभागाकडे केवळ सहा मशीन उपलब्ध होत्या. तेव्हापासून मशीन खरेदीसाठी कोणी पुढाकारच घेतला नाही. ‘लोकमत’ने डासांची वाढलेली पैदास व अकोलेकरांच्या आरोग्याचा मुद्दा सातत्याने लावून धरल्यानंतर महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी २0 मशीन खरेदीसाठी निविदा मागविण्याचा निर्णय घेतला आहे. 

ठळक मुद्दे२0 मशीनसाठी प्रशासनाने मागितल्या निविदाहिवताप विभागाचा कारभार हवेत!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : उशिरा का होईना, अखेर महापालिका प्रशासनाने धुरळणीसाठी फॉगिंग मशीन खरेदीचा निर्णय घेतला. मागील दहा वर्षांपासून हिवताप विभागाकडे केवळ सहा मशीन उपलब्ध होत्या. तेव्हापासून मशीन खरेदीसाठी कोणी पुढाकारच घेतला नाही. ‘लोकमत’ने डासांची वाढलेली पैदास व अकोलेकरांच्या आरोग्याचा मुद्दा सातत्याने लावून धरल्यानंतर महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी २0 मशीन खरेदीसाठी निविदा मागविण्याचा निर्णय घेतला आहे. परतीच्या पावसामुळे शहरात विविध ठिकाणी पाणी तुंबले आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, खुल्या भूखंडांवर बाराही महिने सांडपाण्याची समस्या दिसून येते. साफसफाईच्या कामांचा पुन्हा एकदा बोजवारा उडाल्यामुळे प्रभागांमध्ये घाणीचे ढीग साचले आहेत. परिणामी, डासांची पैदास वाढली असून, नागरिकांना आजारांचा सामना करावा लागत असल्याची परिस्थिती आहे. सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी, खोकला व तापेने अकोलेकर फणफणल्याचे चित्र आहे. शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी दिसून येते. अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात असताना महापालिकेच्या मलेरिया (हिवताप) विभागाला सोयरसूतक नसल्याचे दिसून येते. हद्दवाढीमुळे शहराचा विस्तार वाढला. नवीन प्रभागांमध्ये मूलभूत सुविधांची वानवा असून, साचलेले पाणी व डासांमुळे नागरिक त्रस्त आहेत. सुमारे साडेपाच लाख लोकसंख्येच्या शहरात डासांचा प्रकोप रोखण्यासाठी मलेरिया विभागाकडे अवघ्या सहा धुरळणी व १४ ते १५ फवारणी मशीन उपलब्ध आहेत. मलेरिया विभागाने प्रभागांमध्ये नियमित धुरळणी आणि फवारणी करणे क्रमप्राप्त असताना या विभागाचे कर्मचारी दिवसभर असतात कुठे, असा सवाल उपस्थित होतो. धुरळणीसाठी या विभागाने मागील दहा वर्षांपासून नवीन मशीनची खरेदीच केली नाही. धुरळणी व फवारणीसाठी लागणारे औषध आरोग्य उपसंचालक कार्यालयामार्फत प्राप्त होत असल्याने सदर औषधांचा तुटवडा भासण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. अशा स्थितीत सहा मशीनवर २0 प्रभागांमध्ये नियमित धुरळणी कशी होऊ शकते, असा सवाल ‘लोकमत’ने उपस्थित केला होता. या बाबीची दखल घेत महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी २0 फॉगिंग मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेत निविदा मागविल्या. सदर निविदा प्रशासनाला प्राप्त झाल्या असून, त्यावर प्रशासनाकडून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. 

हिवताप विभागाचा कारभार हवेत!हिवताप विभागाच्या अखत्यारीत असलेल्या जीवशास्त्रज्ञ डॉ. विजया मोडक यांची उचलबांगडी केल्यानंतर हे पद रिक्त आहे, तर पर्यवेक्षकाला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर या विभागाचा प्रभार वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख यांच्याकडे होता. डॉ. शेख निलंबित झाल्यामुळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अस्मिता पाठक यांच्याकडे प्रभार सोपवण्यात आला. या परिस्थितीचा फायदा विभागातील कर्मचारी घेत असल्याने हिवताप विभागाचा कारभार हवेत सुरू असल्याचे दिसून येते.