कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाने कारवाईचा सपाटा सुरु केला आहे. मंगळवारी शहरातील विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. न.प.चे मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी बाजार परिसरात फिरुन आढावा घेतला. ठाणेदार सचिन यादव यांनी पोलीस बंदोबस्त ठेवून कारवाईमध्ये सहभाग घेतला. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय अधिकारी अभय सिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनात कोरोना तपासणी मोहीम शिबिराच्या माध्यमातून सुरू आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शहरातील नागरिक, सर्व दुकानदार, व्यापाऱ्यांनी कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी १०.०० ते ३.०० वाजतापर्यंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिकांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी केले आहे. (फोटो)
विनामास्क फिरणाऱ्या २४ जणांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:18 IST