शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सेतू केंद्र संचालकावर फेकली शाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 02:54 IST

सध्या जिल्हाभरात सेतू केंद्रांवर कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या सेतू केंद्रांवर शेतकर्‍यांकडून ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पैशांची मागणी होत आहे. शहरातील गोरक्षण रोडवरील नगर परिषद कॉलनीतील श्रीनाथ गळीतकर यांच्या सेतू केंद्रावरसुद्धा कर्जमाफीचा अर्ज भरून देण्यासाठी पैसे घेण्यात येत असल्याचे परिसरातील युवकांना समजताच, रविवारी सकाळी सेतू केंद्रावर आंदोलन केले आणि सेतू केंद्र संचालक व त्याच्या कर्मचार्‍यावर युवकांनी शाई फेकून निषेध नोंदविला. 

ठळक मुद्देयुवकांचे आंदोलन कर्जमाफीसाठी अर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांची लुबाडणूक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सध्या जिल्हाभरात सेतू केंद्रांवर कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या सेतू केंद्रांवर शेतकर्‍यांकडून ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पैशांची मागणी होत आहे. शहरातील गोरक्षण रोडवरील नगर परिषद कॉलनीतील श्रीनाथ गळीतकर यांच्या सेतू केंद्रावरसुद्धा कर्जमाफीचा अर्ज भरून देण्यासाठी पैसे घेण्यात येत असल्याचे परिसरातील युवकांना समजताच, रविवारी सकाळी सेतू केंद्रावर आंदोलन केले आणि सेतू केंद्र संचालक व त्याच्या कर्मचार्‍यावर युवकांनी शाई फेकून निषेध नोंदविला. गोरक्षण रोडवरील नगर परिषद कॉलनीमध्ये सेतू केंद्र आहे. या सेतू केंद्रावर कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकरी गर्दी करीत आहेत. या सेतू केंद्रातील कर्मचारी शेतकर्‍यांकडून अर्ज भरण्यासाठी पैसे उकळत असल्याची माहिती परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांंना मिळाली. त्यांनी रविवारी सेतू केंद्रावर जात, सेतू केंद्र संचालक श्रीनाथ गळीतकर याला जाब विचारला आणि शासनाच्या नियमानुसार शेतकर्‍यांकडून पैसे घेता येत नाही. असे असतानाही सेतू केंद्रातील कर्मचारी शेतकर्‍यांकडून पैसे कसे काय घेतात, असा प्रश्न उपस्थित केला; परंतु केंद्र संचालकाला कोणतेही उत्तर देता आली नाही.  यावेळी कार्यकर्त्यांनी सोबत आणलेल्या बाटलीतील शाई सेतू केंद्र संचालकासह त्याच्या कर्मचार्‍यांच्या अंगावर फेकली आणि त्याला शेतकर्‍यांकडून पैसे न घेण्याबाबत ताकीद देण्यात आली. यावेळी निशिकांत बडगे, बंटी आंबुस्कर, आकाश सोनोने, भूषण गणोजे, तुषार इटोले, ऋषिकेश जाधव, तुषार देशमुख, प्रवीण सोनोने, महेश आगरकर, चेतन सोमाणी आदी युवक सहभागी झाले होते.