शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या चार दिवसांत सार्वजनिक शौचालय कोसळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:28 IST

अकोला : सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करून चार दिवसांचा अवधी होत नाही, तोच शौचालयाची संपूर्ण भिंत कोसळल्याचा प्रकार प्रभाग ८ अंतर्गत येणार्‍या डाबकी येथे उघडकीस आला. निर्माणाधिन शौचालयाचे बांधकाम सुमार दर्जाचे होत असल्याचा आरोप डाबकी येथील रहिवाशांनी केला असून, याप्रकरणी महापालिका प्रशासन कंत्राटदारावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

ठळक मुद्दे प्रभाग ८ मध्ये डाबकी येथील प्रकारस्वच्छता विभाग, बांधकाम विभाग संशयाच्या घेर्‍यात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करून चार दिवसांचा अवधी होत नाही, तोच शौचालयाची संपूर्ण भिंत कोसळल्याचा प्रकार प्रभाग ८ अंतर्गत येणार्‍या डाबकी येथे उघडकीस आला. निर्माणाधिन शौचालयाचे बांधकाम सुमार दर्जाचे होत असल्याचा आरोप डाबकी येथील रहिवाशांनी केला असून, याप्रकरणी महापालिका प्रशासन कंत्राटदारावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत’अभियानांतर्गत शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने गरजू लाभार्थींना वैयक्तिक शौचालय बांधून दिले जात आहे. शहराची हद्दवाढ झाल्यानंतर नवीन प्रभागांमध्ये नागरिकांकडे शौचालयेच नसल्याचे चित्र समोर आले. पहिल्या टप्प्यात शहरात वैयक्तिक तसेच आवश्यक त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालये बांधून दिल्यानंतर दुसर्‍या टप्प्यात नवीन प्रभागांमध्ये शौचालये बांधणीला सुरुवात करण्यात आली. मनपा क्षेत्रात सामील झालेल्या प्रभाग ८ मधील डाबकी येथे सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम सुरू करण्यात आले. याठिकाणी दहा ‘सिट’ची व्यवस्था करण्यात आली. शौचालयांचे बांधकाम करून चार दिवसांचा अवधी होत नाही, तोच शौचालयाची संपूर्ण भिंत कोसळल्याचा प्रकार उजेडात आला. त्यामुळे शौचालयाचे बांधकाम सुमार दर्जाचे झाल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या निधीची अशाप्रकारे उधळपट्टी होत असल्यामुळे या प्रकरणी प्रशासन काय निर्णय घेते, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे. 

स्वच्छता विभाग, बांधकाम विभाग संशयाच्या घेर्‍यातशहरात सार्वजनिक असो वा वैयक्तिक शौचालय बांधण्याची जबाबदारी मनपाच्या स्वच्छता विभागाकडे आहे. असे असताना शौचालय बांधकामाची फाइल बांधकाम विभागामार्फत चालवण्यात आल्याची माहिती आहे, तर शौचालयाच्या बांधकामांवर केवळ देखरेख ठेवण्याची जबाबदारी असल्याचे सांगत बांधकाम विभागाने हात झटकत चेंडू स्वच्छता विभागाकडे टोलवला. एकूणच गंभीर प्रकार लक्षात घेता, दोन्ही विभाग संशयाच्या घेर्‍यात सापडले आहेत.

कनिष्ठ अभियंता होते कोठे?सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंत्यावर होती. शौचालयाचे निकृष्ट बांधकाम होत असताना संबंधित अभियंता नेमके कोणते कर्तव्य बजावत होते, असा सवाल उपस्थित होतो. 

अन् नगरसेवकांची धावाधाव सुरू!प्रभाग ८ मध्ये चारही नगरसेवक भाजपाचे आहेत. एका नगरसेवकाच्या मर्जीतल्या कंत्राटदाराला शौचालय बांधण्याचा कंत्राट मिळवून देण्यात आला. शौचालय कोसळल्यानंतर कंत्राटदाराला वाचविण्यासाठी नगरसेवकाने धावाधाव सुरू केली आहे. शौचालयाचे बांधकाम योग्यरीतीने होत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे स्वत:हून शौचालयाची भिंत पाडल्याची सारवासारव नगरसेवकाने सुरू केल्याची माहिती आहे. शासन निधीची अशारीतीने उधळपट्टी होत असल्यामुळे या प्रकरणी महापालिका आयुक्त अजय लहाने काय भूमिका घेतात, याकडे सर्वांंचे लक्ष लागले आहे.