शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

आजपासून जनता कर्फ्यू; संभ्रम कायमच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 09:15 IST

जनता कर्फ्यूच्या धास्तीने गुरुवारी अकोल्याच्या बाजारपेठेत गर्दी उसळली होती.

अकोला : विदर्भ चेंबर आॅफ कामर्स अकोल्याच्या पुढाकाराने व सर्व व्यापारी संघटनांच्या एकमताने २५ ते २९ पर्यंत जाहीर करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. या कर्फ्यूसंदर्भात राजकीय पक्ष, लहान व्यापारी यांची नकारात्मक भूमिका असल्याने जनता कर्फ्यूचे स्वरूप कसे राहील, याबाबत संभ्रम कायमच आहे. दरम्यान, या जनता कर्फ्यूच्या धास्तीने गुरुवारी अकोल्याच्या बाजारपेठेत गर्दी उसळली होती.

राजकीय पक्ष म्हणतात...मागील ६ महिन्यांपासून अधिक काळापासून सामान्य जनजीवन विस्कळीत झालेले आहे. रोजच्या उदरनिर्वाहाच्या संकटासोबतच जीवन आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे, अशा स्थितीत जनता कर्फ्यू पर्याय होऊ शकत नाही, कर्फ्यूऐवजी प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजनांसाठी सामूहिक उपक्रम सर्वांच्या समन्वयातून राबविण्याची गरज आहे.रणधीर सावरकर,आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष अकोला. जनता कर्फ्यू हा जनतेच्या भल्यासाठी आहे, त्यामुळे नागरिकांनी प्रतिसाद दिला पाहिजे. आरोग्य हे सर्वात महत्त्वाचे आहे. प्रशासन उपाययोजना करतच आहे, त्यासाठी नागरिकांनीही सकारात्मक होऊन सहभागी होणे कुटुंब व समाजाच्या हिताचे आहे.नितीन देशमुख, आमदार व जिल्हाप्रमुख शिवसेना. जनता कर्फ्यूची वाट पाहण्याची वेळ नको. कोरोनाचे संकट हे दीर्घकालीन असल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे, त्यामुळे नागरिकांनी स्वयंस्फूर्तिने दक्षता घेण्याची गरज आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करून कोरोनाला दूर ठेवावे-संग्राम गावंडे, जिल्हाध्यक्ष, राष्टÑवादी काँग्रेस. कोरोनावर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांसोबतच सुरक्षेचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे. जनता कर्फ्यूमुळे कोरोनाची साखळी तुटत असेल तर नागरिकांनी समर्थन केले पाहिजे.ज्यांना शक्य आहे त्यांनी तो पाळावा.बबनराव चौधरी, महानगराध्यक्ष, काँग्रेस. जनता कर्फ्यूमुळे कोरोना संसर्ग साखळी खंडित होणार नाही; मात्र आता कुठे जनजिवन सुरळीत होत असताना त्याला मात्र बे्रक बसेल. सर्वसामान्यांच्या रोजगारावर गंडांतर येईल, दुकाने बंद राहिली तर तेथील मजुरांना मजुरी मिळणार नाही, त्यामुळे उपाययोजना कराव्या, बंद नको.-प्रमोद देंडवे, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी. 

नाभिक समाजाचा विरोधनाभिक समाजाची सर्व दुकाने लॉकडाऊनच्या काळात तब्बल ९८ दिवस बंद होती. त्या काळात समाजाने केलेल्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यावरही अटी शर्तीवर दुकाने सुरू आहेत. या दुकानांच्या भरवशावरच उदरनिर्वाह आहे, त्यामुळे नाभिक समाज जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होणार नाही, असे निवेदन नाभिक समाज दुकानदार संघटनेच्यावतिने अध्यक्ष गजानन वाघमारे, पांडुरंग मानकर, अनिल वायकर, सुभाष निंबोकार, राजेश श्रीवास्तव, जावेद अहेमद आदींनी दिले. भाजीपाला विक्रेता असोसिएशनचा विरोधमहाराष्टÑ चिल्लर भाजीपाला विक्रेता असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात जनता कर्फ्यूला विरोध करत असल्याचे स्पष्ट केले आहे. विदर्भ चेंबरने सर्व व्यापारी संघटनांना विश्वासात घेऊन एकमताने निर्णय घेतला नसल्याचाही आरोप असोसिएशनचे सचिव काशिनाथ ताजणे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

 भाजीपाल्यावर महागाईचा तडका व्यापाºयांनी पाच दिवसांच्या जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. शुक्नवारपासून बाजारपेठ खुली होताच भाजीबाजारात प्रचंड गर्दी उसळली होती. अनेक भाज्यांची कमी झालेली आवक अन् ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता भाजीपाल्याचे दर महागले होते. दरवाढीच्या या तडक्यामुळे ग्राहकांना मात्र भुर्दंड बसला. टमाटे, भेंडी, पालक, कोबी, पत्ताकोबी, मिरची यांसह फळांचीही चढ्या भावात विक्री झाली.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या