आकोट : विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. गुरुवारी प्रशासनाकडून शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. तसेच आदर्श आचारसंहिता, निवडणुकीच्या प्रक्रियेसंबंधीची प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. आचारसंहितेचे पालन करण्यासाठी एकूण ६ पथकाची नेमणूक करण्यात आली असून, या प थकामध्ये विविध यंत्रणांचे अधिकारी-कर्मचार्यांसह पोलिसांसाही समावेश आहे. आदर्श आचारसंहिता पथकासोबत व्हिडीओ कॅमेरा तसेच मतदारसंघात येणार्या प्रमुख मार्गावर नाकाबंदी करण्यात येणार असून, प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान शहरातून काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीमध्ये उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप चव्हाण, तहसीलदार प्रदीप पाटील, ठाणेदार कैलास नागरे, मुख्याधिकारी समीर लाठीसह कर्मचारी सहभागी झाले होते.
आकोटात मतदारांकरिता जनजागृती रॅली
By admin | Updated: September 20, 2014 00:54 IST