शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनेसाठी ९१ कोटींची तरतूद

By admin | Updated: January 7, 2016 02:31 IST

अमृत योजनेंतर्गत शहरातील पाणीपुरवठा योजनेचा नव्याने आरा खडा तयार.

आशीष गावंड/अकोला : अमृत योजनेंतर्गत शहरातील पाणीपुरवठा योजनेचा नव्याने आरा खडा तयार करण्यासाठी राज्य शासनाकडून तब्बल ९१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. योजनेच्या प्रकल्प अहवालाविषयी (डीपीआर) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला शासनाचे पत्र प्राप्त झाले. यापूर्वी शहर पाणीपुरवठा योजनेच्या हस्तांतरणाला स्पष्ट नकार देणार्‍या मजीप्राने डीपीआर तयार करण्याचे काम मिळावे, यासाठी महापालिका प्रशासनाकडे प्रयत्न सुरू केले आहेत, हे विशेष. केंद्र शासनाने अमृत योजनेसाठी अकोला शहराची निवड केली. अमृत योजनेंतर्गत भूमिगत गटार योजना आणि शहराची पाणीपुरवठा योजना नव्याने तयार करण्याचा समावेश आहे. या दोन्ही योजनांसाठी केंद्र शासनाकडून निधी प्राप्त होणार असून, केंद्र शासनाच्या निर्देशानुसारच कामकाज केले जाईल. मध्यंतरी केंद्र शासनाच्या वेबसाइटवर महापालिका प्रशासनाने भूमिगत गटार योजनेची माहिती अपलोड केली होती. यादरम्यान, पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने सुरू करून त्यासाठी २१0 कोटींची तरतूद करण्याचे पत्र महापौर उज्ज्वला देशमुख यांनी मु ख्यमंत्र्यांना दिले. त्यानुसार अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी पहिल्या टप्प्यात ९१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या निधीची तरतूद केल्यानंतर योजनेचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासंदर्भात शासनाचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला पत्र प्राप्त झाले. अकोला शहराची पाणीपुरवठा योजना पुन्हा एकदा मजीप्राकडे सोपविण्यास स्थानिक लोकप्रतिनिधी, महापालिकेतील सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नगरसेवकांची संम ती असताना ही योजना स्वीकारण्यास मजीप्राने शासन दरबारी स्पष्ट नकार दिला होता. आता मात्र पाणीपुरवठा योजनेचा डीपीआर तयार करण्याचे काम मिळावे, म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने मनपा प्रशासनाला पत्र दिले आहे. प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी नियुक्त करण्याचा ठराव देण्याची मागणी मजीप्राने केली आहे. या मुद्यावर महापालिकेतील सत्ताधारी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.