शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडरची पूजा अन् आरती करून दरवाढीचा केला निषेध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:22 IST

अकोला : केंद्र सरकारने केलेल्या घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीचा निषेध करीत, शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गॅस सिलिंडरची पूजा आणि ...

अकोला : केंद्र सरकारने केलेल्या घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीचा निषेध करीत, शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गॅस सिलिंडरची पूजा आणि आरती करून राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हा शाखेच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारकडून दर महिन्याला घरगुती गॅस सिलिंडरची दरवाढ करण्यात येत असून, उज्ज्वला गॅस योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप करीत, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी अकोला जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गॅस दरवाढीला विरोध दर्शविण्यात आला. या आंदोलनादरम्यान गॅस सिलिंडरची पूजा करण्यात आली तसेच आरती करून गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला. मोदी सरकार विरोधात घोषणा देत गॅस दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष उज्ज्वला राऊत यांच्यासह प्रदेश सरचिटणीस छाया कात्रे, सुनीता सावळे, अर्चना थोरात, वृंदा मंगळे, ॲड. जया जुनारे, डाॅ. सपना राऊत, सुनीता ताथोड, सुषमा राठोड, दीपमाला खाडे, उमा महल्ले, किरण पवार, मंगला कलोशिया, सानिका राजपूत, शबनम खान, आलियाखान, तराणा इंगळे, आदी पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या.

...तर तीव्र आंदोलन

छेडण्याचा इशारा!

घरगुती गॅस सिलिंडरची दरवाढ तातडीने केंद्र सरकारने कमी करावी, अन्यथा दरवाढ विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारादेखील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष उज्ज्वला राऊत यांनी यावेळी दिला.

..........................फोटो................................