शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘सावित्री’ करणार महिलांचे रक्षण

By admin | Updated: March 18, 2015 23:35 IST

राज्यात लवकरच सुरु होणार १८१ क्रमांकाची हेल्पलाईन.

खामगाव (जि. बुलडाणा) : परिस्थितीमुळे अनेक अडचणींना तोंड देत असलेल्या महिला, तसेच रात्री अपरात्री संकटात सापडलेल्या महिलांसाठी आता सावित्री हेल्पलाईन वरदान ठरणार आहे. महिला व बाल कल्याण विभागाने यासाठी पुढाकार घेतला असून, ही हेल्पलाईन लवकरच सुरु होणार आहे.गतवर्षी दिल्ली येथे २३ वर्षीय विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. त्यावेळी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी महिलांच्या मदतीसाठी १८१ या क्रमांकाची हेल्पलाईन सुरु करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार टप्प्या-टप्प्याने ही हेल्पलाईन सर्वच राज्यात सुरु होत आहे. महाराष्ट्रात ही हेल्पलाईन सुरु करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने पुढाकार घेतला आहे. महिलांना सुरक्षेची खात्री देणार्‍या या हेल्पलाईनसाठी कर्मचार्‍यांना खास प्रशिक्षणही देण्यात आले असून लवकरच ही हेल्पलाईन प्रत्यक्षात कार्यान्वित होणार आहे. सावित्री (स्टेट वाईड अँप फॉर व्हच्र्युएल इंटिग्रेशन ऑर ट्रॅकिंग अँन्ड इन्फॉर्मेशन) हेल्पलाईनवर फोन करताच संबंधित महिलेपर्यंंत काही मिनिटातच मदत पोहोचणार आहे. ही हेल्पलाईन पोलिस प्रशासनाशी कनेक्ट असणार आहे. संकटग्रस्त महिलेला मदत मिळेपर्यंंत हेल्पलाईनव्दारे तिच्याशी संपर्कात राहता येणार आहे.*अशी राहिल कार्यपध्दतीही हेल्पलाईन पोलिस प्रशासनाशी कनेक्ट असणार आहे. यामुळे संकटग्रस्त महिलेने हेल्पलाईनवर फोन केल्यानंतर मोबाईल ट्रॅक करुन जवळील पोलिस चौकीला महिलेच्या ठिकाणाची माहिती दिली जाणार आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचून महिलेला मदत करतात की नाही, याची उलटतपासणीही हेल्पलाईनव्दारे केली जाणार आहे. त्यामुळे जर संबंधित महिलेच्या कॉलला पोलिस प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही, तर संबंधित पोलिस अधिकार्‍यांची तक्रार वरिष्ठांकडे केली जाणार आहे.